वैभव पगार: प्रतिनिधी-दिंडोरी | “जीवन फार सुंदर आहे. त्याचा योग्य आनंद घेतला पाहिजे” असे प्रतिपादन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले. दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित सायबर क्राईम व युवक युवतींनी जबाबदारी व स्वसंरक्षण याबाबत मार्गदर्शन करतांना शेगर बोलत होते. ते पुढे म्हणाले चारित्र्याची पडताळणी अनेकांना पोलीस खात्याकडून द्यावी लागते मग आपल्या चारित्र्यावर आपलाच विश्वास आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होत असतो. एस.आय. डी, आय.डी, सी. आय.डी अशा विविध शाखातून गुप्तवार्ता जाणून घेतली जाते. समाजात सायबर क्राईमची प्रचंड उलाढाल होत असते. त्याला कारणीभूत मोबाईल आहे.
Dindori | नवोदय विद्यालय प्रवेश अर्ज करण्याची उद्या शेवटची मुदत.
सुसंस्कृत प्रधान देशात जन्माला आलो हे आपले भाग्य
मोबाईल वरील वेगवेगळ्या ॲप मधून येणाऱ्या ज्या लिंक असतात त्या लिंकची आपण खात्री करून घेतली पाहिजे. नाहीतर पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. यातून मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. त्या विविध अमिषाला त्या बळी ठरतात. मित्रांनो जीवन फार सुंदर आहे. त्याचा योग्य आनंद भरभरून लुटावा आयुष्यामध्ये संस्कारांची उत्क्रांती करावी. आपण सुसंस्कृत प्रधान देशात जन्माला आलो हे आपले अहोभाग्य आहे. आयुष्य जगण्यासाठी आहे दुसऱ्याच्या हाती देण्यासाठी नाही. शासन मुलींच्या पाठी आहे, पण कायद्यापुढे मात्र सर्व समान आहेत. मुलींनीही स्वतःची दक्षता घ्यावी व आपल्या परिवाराचा नावलौकिक उंचावण्यास मदत करावी.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीणनाना जाधव होते.
यावेळी व्यासपीठावर मविप्र संचालक प्रवीणनाना जाधव, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, अभिनव बालविकास समितीचे अध्यक्ष दौलतदादा उखर्डे, प्राचार्य शरद शेजवळ, बंडू भाऊ भेरे, सेवक सोसायटीचे चिटणीस कृष्णराव मोरे,उपप्राचार्य उत्तम भरसठ, पर्यवेक्षक श्रीमती सविता शिंदे, रावसाहेब उशीर, कॉलेज विभागप्रमुख प्राध्यापक माने, श्रीमती सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
“मनावर ताबा ठेवला तर अनुचित प्रकार घडणार नाही”
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले. ते म्हणाले समाजामध्ये घडत असलेले मुलींवरील अनुचित प्रकार त्यांचे वाढते प्रमाण व किशोरावस्थेत मुले-मुली भरकटतात हा संशोधनाचा विषय आहे. आपण सर्वांनी मनावर ताबा ठेवला तर अनुचित प्रकार आपोआप थांबतील व सुसंस्कृतपणा जागृत होईल. पाल्यांनी मात्यापित्यांच्या आज्ञेचे पालन करावे. मोबाईलचा अतिरेक टाळावा ज्यामुळे पिढ्या या बरबाद होत आहे.
Dindori | परिवर्तन आघाडीमुळे प्रस्थापित पक्षांच्या पोटात गोळा – प्रा. संदीप जगताप
“सुसंस्कृतपणातून चारित्र्य घडवावे”
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना मविप्र संचालक प्रवीणनाना जाधव यांनी बोलताना सांगितले “चारित्र्य मानवी जीवनातील महत्त्वाचे अंग आहे. ज्ञानामुळे पैसा संपत्ती मिळते. पण चारित्र्य, जर हिन दर्जाचे झाले, तर आपले नावलौकिक धुळीला मिळत असतो. म्हणून सुसंस्कृतपणातून चारित्र्य घडवावे. जो थोरामोठ्यांची आज्ञा ऐकतो तो यशस्वी होतो. आई-वडिलांची इच्छा पूर्ण करा पुस्तक वाचून मोठे व्हा. सद्गुन ऐका व अंगीकार करा चांगल्या माणसाला आरोग्य, वर्तन, शिस्तप्रियता असावी. यामुळे आपण जीवनात यशस्वी होतो. महिलेने तिची खरी ताकद दाखवली तर पुरुषांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचतो. मग पुरुषांनीच भान ठेवून राहिले तर वितुष्ट निर्माण होणार नाही. यावेळी सौ. अपर्णा देशपांडे यांनी “नवदुर्गेचा मार्ग आचरा” हे गीत सादर केले. सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब उशीर यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम