सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | महाराष्ट्र शासन वन विभाग वनपरिक्षेत्र अधिकारी देवळा व शून्य सर्पदंश जनजागृती अभियानांतर्गत ‘एरिआस’ फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा येथील ‘मविप्र’समाज संचलित अभिनव व जनता विद्यालयात १ ते ७ आक्टोबर वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
Deola | संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत माळवाडी ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनिष बोरसे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सर्पमित्र सुशांत रणशुर, राजेश शेजवळ, देवळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव, प्रसाद पाटील, वनपाल प्रवीण शेवाळे, डी.पी. गवळी, देविदास चौधरी, वनरक्षक विजय पगार, ज्योती सोनवणे, सुवर्णा इकडे, नामदेव ठाकरे, कल्पना गांगुर्डे, जी.जी.पवार, उपेंद्र राठोड आदि मान्यवर उपस्थित होते.
वन्यजिवांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली
यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनिष बोरसे यांनी केले. यावेळी सर्पमित्र सुशांत रणशूर यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव वाघ, बिबट, तरस त्याचप्रमाणे बिनविषारी निमविषारी व विषारी सर्प याविषयी माहिती देत त्यांच्यापासून आपण आपले संरक्षण कसे केले पाहिजे, यासह वन्यजीवांचे निसर्गतः असणारे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
सर्प दर्शनानंतर काय करावे याबाबत मार्गदर्शन
सर्पाच्या विविध जातींचे प्रत्यक्ष चित्रांद्वारे माहिती देत सर्पदंश झाल्यानंतर काय करावे? याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तर शेतात जाताना-येताना व काम करत असताना कशा पद्धतीने काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करत वन्यजीवांचे महत्व विशद केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश बिरारी यांनी केले. तर आभार सुरेश आहेर यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम