वैभव पगार- प्रतिनिधी: दिंडोरी | येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात परिवर्तन आघाडीच्या रूपाने तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होत असतांना काल संजय राऊत यांनी यावर टीका करतांना म्हटले, की कोणतीही तिसरी आघाडी ही सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. त्यांच्या या विधानाला आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. संदीप जगताप यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
Dindori | स्वाध्याय परिवार समाजप्रबोधनपर पथनाट्याद्वारे साजरी करणार जन्माष्टमी
ही आघाडी शेतकऱ्यांसाठी आयुष्य घालवलेल्यांची आहे.- संदीप जगताप
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, काल संजय राऊत यांनी परिवर्तन आघाडीवर टीका करताना असे म्हटले कुठलीही तिसरी आघाडी ही सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी असते. पण संजय राऊतांना समजलंच नाही की ही परिवर्तन आघाडी अशा लोकांची आहे की ज्यांनी वयाची पंचवीस – तीस वर्षे किंबहुना संपूर्ण आयुष्य हे शेतकरी व सर्वसामान्य माणसासाठी खर्च केलेल्या नेत्यांची आहे. राजू शेट्टी साहेब, बच्चू कडू, वामनराव चटक, शंकर अण्णा धोंडगे, सँभाजी राजे यांनी एकत्र येऊन ही परिवर्तन आघाडी तयार केलेली आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, “परिवर्तन आघाडीला जनतेचा मोठा प्रतिसाद आहे. यामुळेच फक्त संजय राउतच नव्हे तर प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पोटात गोळा आला आहे. संजय राऊत यांचं कालच स्टेट्मेंट हे त्याचं प्रतीक आहे. आज पर्यंतच्या सत्तर वर्ष्यात सत्ताधारी पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचा फक्त वापर केलेला आहे. खुर्ची गेली की शेकऱ्याच्या नावाने बोंबा मारायच्या आणि सत्तेत आलं की शेकऱ्याला व सर्वसामान्य माणसाला विसरायचं हीच यांची आज पर्यंतची रणनिती राहिलेली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांनी शेतकरी चळवळी फोडण्याचा काम केलंय. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र यावे ही शेतकऱ्यांच्या मनात असलेळी गोस्ट प्रत्यक्षात उतरत आहे आणि त्यास संभाजी राजेंची सुद्धा साथ मिळते आहे. हे सर्व बघूनच यांच्या पोटात गोळा उठलेला आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला परिवर्तन आघाडी सर्व जागांवर लढेल आणि सर्वसामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी परिवर्तन आघाडी सत्तेत येईल हे नक्की आहे.”
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम