Nashik Crime | मृतदेहाजवळ पूजा केल्याच्या अघोरी घटनेने नाशकात खळबळ

0
58
#image_title

Nashik Crime | नाशिक मधील जेलरोड भागात एका विचित्र घटनेच्या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. शनिवार दि. 21 रोजी सोशल मीडियावर अघोरी प्रकार घडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये गळफास घेतलेल्या पतीच्या लटकत्या मृतदेहासमोर पूजेचे साहित्य मांडून पत्नी पूजाविधि करण्यासाठी बसली असल्याचे दिसून येत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा अघोरी आणि जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला तसेच या व्हिडिओवरून जेलरोड भागात जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या प्रकारातून पतीचा बळी दिला असल्याचा चर्चांना उधाण आले होते. पण नाशिक रोड पोलिसांनी या प्रकाराचे खंडन केले असून हा कोणताही अघोरी किंवा जादूटोणातून झालेला मृत्यू नसून मानसिक व कौटुंबिक त्रासातून झाला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण नागरिक मात्र व्हायरल व्हिडिओमुळे शंका व्यक्त करत आहेत.

Nashik Crime | धक्कादायक!; नाशकात अटकेची भीती घालत भामट्यांनी लाखो लुबाडले

11 सप्टेंबर रोजी जेलरोड परिसरातील ब्रिजनगरमध्ये रात्री साडेआठच्या सुमारास नवनाथ भगवंत घायवट या व्यक्तीने आपल्या स्वयंपाक घरातील छताला असलेल्या हुकाला ओढणी बांधत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नाशिकरोड पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदही करण्यात आली होती, परंतु या घटनेला आठवडा उलटून गेल्यानंतर नवनाथ घायवट यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.

नेमके काय दिसले व्हायरल व्हिडिओमध्ये

या व्हायरल व्हिडिओमध्ये नवनाथ घायवट यांचा मृतदेह छताला लटकताना दिसतो, त्याखाली आणि आजूबाजूला धार्मिक पूजा मांडलेली असून जवळच एक महिला बसलेली दिसते, तर मृतदेहाच्या अंगावर आणि ठिकठिकाणी हळद व कुंकवासारखे पूजेचे साहित्य लावलेले दिसून येते. त्यामुळे हा प्रकार अघोरी आणि जादूट्याचा असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली. मात्र पोलिसांनी केलेले तपासामध्ये याची दुसरी बाजू उजेडात आली.

Nashik Crime | उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; मद्य तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

पोलिस तपासात सत्य समोर

नवनाथ घायवट यांच्या मृत्यूशी अघोरी प्रकाराच्या घटनेचा काही संबंध नसून त्यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला असल्याचा दावा नाशिक रोड पोलिसांनी केला आहे. मयत नवनाथ घायवट यांची पत्नी मानसिक रुग्ण असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटना ज्या दिवशी घडली तेव्हा त्यांच्या घरी दुर्गाष्टमीची पूजा आयोजित करण्यात आली होती. याचवेळी त्यांच्यात काहीतरी कौटुंबिक कलह झाला असून पत्नीच्या त्रासाला कंटाळून नवनाथ यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर घायवट यांचे किराणा दुकान असून त्यांची मुले शिक्षणासाठी पुण्यामध्ये आहेत. पत्नी मानसिक रुग्ण असल्याने वेड्यासारखी वागत वारंवार घर सोडून जाते याच जाचाला कंटाळून कदाचित त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले असावे असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. तसेच घायवट यांच्या पत्नी वर सुरू असलेल्या मानसिक उपचारांची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here