Dindori | नाशिक जिल्हा बँकेसाठी विशेष पॅकेज द्या; राजू शेट्टी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी..

0
14
#image_title

वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्हा बँक वाचावी व शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळावी यासाठी संघर्ष करत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा शब्द सहकार मंत्री अतुल सावे व पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला होता. परंतु गेले दोन वर्ष शासनाने याकडे दुर्लक्ष केले.

Deola | कै. शरद जोशींची 89 वी जयंती कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात साजरी

राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी अनेकदा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. परंतु यावर काहीही पावले शासनाने उचलली नाही. म्हणून राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेला राज्य शासनाने मदत करण्याची मागणी केली आहे.

Dindori | शासनाने विशेष मदत केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळणार नाही.

नाशिक जिल्हा बँकेतील साधारणता तीस हजार शेतकरी हे भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. घेतलेल्या कर्जापेक्षा अनेक पटीने व्याज झाल्यामुळे त्यांना कर्ज फेड करणे शक्य नाही. शासनाने विशेष मदत केल्याशिवाय या शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळणार नाही. या शेतकऱ्यांना भूमीहीन होण्यापासून वाचवायचे असेल तर शासनाने जिल्हा बँकेला विशेष मदत केली पाहिजे ही सातत्याने मागणी होते आहे.

Deola | देवळा बस स्थानकावर शुकशुकाट; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सामान्यांना फटका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील अनेकदा बैठका झाल्या. परंतु यावरती मार्ग निघाला नाही. नुकतेच राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशी गळ घातली. निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्हा बँकेला मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्हा बँकेला आम्ही मदत करणार असे आश्वासन दिले आहे.

“तीस हजार शेतकरी भूमीहिन होऊ नये असे सरकारला वाटत असेल तर या सरकारने नाशिक जिल्हा बँकेला विशेष पॅकेज देणे गरजेचे आहे. राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बिऱ्हाड आंदोलनापासून या गोष्टीसाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर जर जिल्हा बँकेला राज्य शासनाने मदत केली नाही तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला लोकसभेप्रमाणेच विधानसभेला सुद्धा या सरकारला सामोरा जावे लागेल. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विशेष पॅकेज सरकारने जिल्हा बँकेला द्यावे व जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती द्यावी. ही आम्हाला अपेक्षा आहे.”

 

संदीप जगताप (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना) 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here