Dikshabhumi | नागपूरच्या दिक्षाभूमी (Dikshabhumi) येथे विकासकाम सुरू असून, येथील अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाचा वाद आता चिघळला आहे. या वादाला आता आक्रमक वळण लागले असून, दीक्षाभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले आणि त्यांनी बांधकामाची तोडफोड करायला सुरुवात केली आहे. या अंडरग्राऊंड पार्किंगमुळे स्तूपाला धोका पोहोचु शकतो, असं दावा करत काही संघटनांनी या बांधकामाला विरोध करत तोडफोड आणि परिसरात जाळपोळ करत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. (nagpur)
दिक्षाभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी जमले असून, त्यांनी बांधकामाची तोडफोड व जाळपोळ सुरू केली आहे. इतर विकासकामाला नाहीतर केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगलाच आमचा विरोध असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. तर दीक्षाभूमी स्मारक समितीने लोकांना विश्वासात न घेता हे काम केल्याचा आरोपदेखील येथील आंदोलकांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, याठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. (Dikshabhumi)
Yeola Muktibhumi | येवला मुक्तीभूमी येथील १५ कोटींच्या विकास कामांचे रविवारी लोकार्पण
Dikshabhumi | नेमकं प्रकरण काय..?
नागपूर येथील दीक्षाभूमी (Dikshabhumi) स्मारक येथे राज्य सरकारच्या माध्यमातून २०० कोटींची विकासकामे सुरु आहेत. त्यात येथे अंडरग्राउंड पार्किंगदेखील उभारण्यात येणार होती. याचे बांधकाम देखील सुरू होते. मात्र, या अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्मारकाला धोका असून, विजयादशमी दिवशी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हे काम धोकादायक असल्यामुळे हे काम तात्काळ थांबवावे यासाठी आंबेडकरी अनुयायांनी या कामाला विरोध करत काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
याठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक जमले असून, आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि आंदोलकांनी बांधकामाची तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली. याठिकाणी सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडुजी व सौंदर्यकरणाला नाही केवळ अंडरग्राउंड पार्किंगला आपला विरोध असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. दरम्यान, यासाठी काही संघटनांकडून ‘चलो दीक्षाभूमी’ हे आंदोलन करण्यात आले असून, यासाठी परिसरात मोठ्या संख्येने स्थानिक महिला पुरुष व बौद्ध अनुयायी जमले आहेत. (nagpur)
कामाला स्थगिती गृहमंत्र्यांची घोषणा
दरम्यान, आता याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामाला स्थगिती दिल्याचे स्पष्ट केले असून, या कामाचा नवीन आराखडा तयार केला जाईल आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यानंतर कामाला पुन्हा सुरुवात केली जाईल, असे आज सभागृहात जाहीर केले.
Nashik Crime News | वादग्रस्त पत्रकांमुळे नाशिकमध्ये तणाव; पोलिसांच्या सजगतेने परिस्थिती नियंत्रणात
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम