Vidhan Parishad Election | राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागा रिक्त असून, या जागांसाठी भाजपने पाच नावं जाहिर केली आहेत. यात लोकसभेत पराभुत भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनाही संधी देण्यात आली आहे. अखेर भाजपकडून पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2024)
भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली असून, त्यात पंकजा मुंडे(Pankaja Munde) सदाभाऊ खोत व परिणय फुके यांच्याही नावांचा समावेश आहे. येत्या १२ जुलैला विधानपरिषदेच्या या ११ रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर, याच दिवशी निकालदेखील जाहीर केला जाणार आहे.
Vidhan Parishad Election | हे आहेत भाजपचे उमेदवार
- पंकजा मुंडे
- योगेश टिळेकर
- परिणय फुके
- अमित गोरखे
- सदाभाऊ खोत
Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनासाठी दिल्लीत हालचाली; भाजपने घेतला मोठा निर्णय..?
मोठ्या भावाची भूमिका घेत मित्रपक्षांनाही दिली संधी
लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे राज्याच्या राजकारणात पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. लोकसभेत दलित आणि मुस्लिम समाजाचा विरोध पत्करल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत भाजपने जातीय समतोल राखल्याचे दिसत आहे. तर, महायुतीत मोठ्या भावाची भूमिका घेत मित्रपक्षांनाही संधी देण्यात आली असून, रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपने संधी दिली आहे.
Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या अडचणी संपेना..; आता काय आहे प्रकरण..?
जातीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची उमेदवारी महत्त्वाची
पंकजा मुंडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळीत आणि या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पराभवाची धूळ चाखावी लागली. हा पराभव मुंडे समर्थकांच्या जिव्हारी लागला असून, बीडमध्ये ४ मुंडे समर्थकांनी आपले जीवन संपवले. यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी आणि ओबीसी समाजाकडूनही करण्यात आली होती. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, पहिल्याच यादीत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
राज्यातील भाजप नेतृत्वाने विधानपरिषद निवडणुकीसाठी केंद्रीय भाजप नेतृत्त्वाकडे ११ नावांची यादी पाठवली होती. त्यापैकी पाच नावांवर शिक्कामोर्तब केले असून, आज ही पाच नावं जाहीर करण्यात आली. यामुळे आता कित्येक वर्षांनंतर पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा सभागृहात येण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असून, या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची ही उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम