Nashik Teachers Constituency Result : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून, यात सकाळपासून नाशिक शिक्षक मतदारसंघ चर्चेत आहे. सकाळीही का मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळून आल्या होत्या आणि आता पुन्हा येवला आणि निफाडच्या मेटपेटीतही प्रत्येकी १ मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. यामुळे मतमोजणी केंद्रावर एकच खळबळ उडाली असून, ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.
नाशिकमध्ये एकूण पाच जास्त मतपत्रिका आढळल्या असून, याची दाखल थेट ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही घेतली आहे. तर, या प्रकरणी आता अधिकच्या पाच मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आला असून, याबाबत निर्णय अंतिम टप्प्यात घेण्यात येणार आहे. यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघातील या घटनेची दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली असून, त्यांनी नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करून या संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली आहे.
Nashik Teachers Constituency Result | उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार..?
नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करत उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय घडलं..? याबाबत सविस्तर माहिती घेतली आहे. जर मतपत्रिका सील केलेल्या होत्या. तर, या पाच अधिकच्या मतपत्रिका आल्या कशा.? आणि त्या कोणत्या जिल्ह्यातील आहेत. याबाबतही त्यांनी माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.
यावर ठाकरे गटाकडून काय आक्षेप घेतला आणि काय भूमिका घेतली..? त्याचे पुढे काय होणार याबाबत त्यांनी विचारणा केली. त्यामुळे आजच्या या निकालाकडे आणि विशेषतः नाशिक शिक्षक मतदार संघाकडे उद्धव ठाकरे यांचे बारीक असल्याचे दिसून आले. दरम्यान, आता याबाबत पुढे काय होणार..? उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट काय भूमिका घेणार..? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम