सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील निमगल्लीजवळ राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका भारती अशोक आहेर यांच्या बंद बंगल्याचा अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत घरातून जवळपास सात तोळे पेक्षा जास्त सोने चोरीस नेले असून या धाडसी घरफोडीने देवळा शहरात एकच खळबळ उडाली आहे. देवळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. शहरात वारंवार घडणाऱ्या छोट्या-मोठ्या चोऱ्यामूळे नागरिक भयभीत झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्ती वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Deola | देवळा तालुक्यात 24 वर्षीय युवकाची राहत्या घरी आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सोमवारी अज्ञात चोरट्यांकडून रात्रीच्या सुमारास घरफोडी
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, देवळा येथील सटाणा रोड लगत असलेल्या निमगल्ली परिसरात राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका भारती अशोक आहेर या दिवाळी सणानिमित्त सोमवारी दि. ४ रोजी तिसगाव ता. देवळा येथे माहेरी गेल्याने व मुलगा प्रतीक हा कामानिमित्त नाशिक येथे गेल्याने घर बंद असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातील व बेडमधील साहित्य अस्ताव्यस्त करत तेथे ठेवलेले सहा तोळेचे लॉकेट, पाच ग्रॅम सोन्याची ठुशी, सहा ग्रॅम छोटी अंगठी असे सोनेचे सात तोळे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले असून, मुलाचे किती सोने लंपास झाले त्याबाबत आता लगेच सांगता येणार नसल्याचे सांगण्यात आले. आज मंगळवारी दि. ५ रोजी सायंकाळी 5 वाजता भारती आहेर आपल्या घरी आल्यावर बंगल्याचा कडीकोंडका तुटलेला दिसल्याने त्यांना शंका आली. आतमध्ये पाहिले असता कपाटातील ड्रॉवरमधून सोने गेल्याचे लक्षात आले. सध्या तरी साडेपाच लाखांपेक्षा जास्त रकमेचा ऐवज व मुद्देमाल त्यांनी हडप केल्याचे लक्षात आले आहे.
Deola | ह. भ. प. कृष्णाजी माऊली विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्सवात सपंन्न
घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेची खबर श्रीमती आहेर यांनी देवळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री उशिरापर्यंत पंचनामा काम सुरू होते. भर वस्तीत ही धाडसी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असल्याची चाचपणी केली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम