Nashik Political | ड्रग्स प्रकरणावरून फेक नारेटीव्ह; युतीच्या बैठकीत फरांदेंचे विरोधकांवर पलटवार

0
69
#image_title

Nashik Political | नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचारार्थ संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत, गेल्या दहा वर्षात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून विरोधकांकडे प्रचारासाठी कुठलेच मुद्दे नाहीत. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Nashik Political | युतीत पक्षांतर्गत वाद सुरूच; शिंदे गटाच्या नेत्याचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

‘फरांदे यांनी केलेली कामे उल्लेखनीय आहेत’

भारतीय जनता पक्षाचे प्रभारी अमित ठाकर यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी, भाजपाने नेहमीच विकासावर भर दिला असून विरोधक सातत्याने फेक नरेटीव सेट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हा संभ्रम दूर करून विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवावी, प्रा. देवयानी फरांदे यांच्यासाठी विकासाचा मुद्दा हाच भरवशाचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी, ‘फरांदे यांनी केलेली कामे उल्लेखनीय आहेत’ असे म्हटले आहे.

महायुतीच्या नेत्यांकडून फरांदे यांच्या कामाचे कौतुक

यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी, नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे यांनी केलेल्या कामांमुळे विरोधकांना घाम फुटला असून आता बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. असे म्हटले. तर विजय करंजकर यांनी फरांदे यांच्या कामकाजाच्या पद्धतीचे कौतुक करीत, दिन-दलीत, कष्टकरी जनतेसाठी तसेच महिलांच्या उन्नतीसाठी फरांदे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. असे म्हटले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी देखील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणाऱ्या लोकप्रतिनिधी असा फरांदेंचा उल्लेख केला आहे.

बैठकीला ही मंडळी उपस्थित होती

या बैठकीला संघटन महामंत्री रवी अनासपुरे, विजय साने, माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, चंद्रकांत लवटे, सूर्यकांत लवटे, अनिल गांगुर्डे, स्वाती भामरे, ॲड. शाम बडोदे, योगेश मस्के, देवदत्त जोशी, सुरेश पाटील, सचिन कुलकर्णी, सुजाता कर्जगीकर, शशिकांत उन्हवणे, दीपाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Nashik Political | नाशिक पश्चिमसह ‘या’ मतदारसंघातील उमेदवारांनी घेतली माघार

ड्रग्स प्रकरणाचा फेक नॅरेटिव्ह

ड्रग्स प्रकरणाचा जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जात असून आजवर ड्रग्स मुक्त नाशिकसाठी मी जितके काम केले आहे, तितके काम टीका करणाऱ्यांनी केले नाही. नाशिक मध्य मतदारसंघात केलेली कामे मी विकासनामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवली आहेत. असे प्रा. देवयानी फरांदे यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here