सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील लोहोणेर येथील गणेश प्रकाश खैरनार (२४) या युवकाने आपल्या राहत्या घरातील पंख्याला दोरीच्या सहयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने लोहोणेर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Deola | ह. भ. प. कृष्णाजी माऊली विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्सवात सपंन्न
आज दुपारच्या वेळी घेतला गळफास
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर येथील विनायक उर्फ गणेश प्रकाश खैरनार (वय २४) याने मंगळवारी दि. ५ रोजी दुपारच्या वेळी आपल्या राहत्या घरी कोणी नसतांना घरातील छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास लावून घेतला. स्थानिक नागरिकांनी गणेशला तातडीने लोहोणेर येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. यानंतर त्याला देवळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश कांबळे यांनी त्यास तपासून खैरनारला मयत घोषित केले.
पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद
याबाबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत गणेश खैरनार याचे आत्महतेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास स. पो. नि. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम