Deola | ह. भ. प. कृष्णाजी माऊली विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्सवात सपंन्न

0
22
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील डोंगरगाव येथील ह. भ. प. कृष्णाजी माऊली विद्यालयाच्या सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्सवात सपंन्न झाला. तब्बल चौदा वर्षानंतर विध्यार्थी, विद्यार्थिनी एकत्र येत मुख्याध्यापक एस. के. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि तत्कालीन शिक्षकांच्या उपस्थितीत वर्ग भरला.

Deola | प्रहार उमेदवार गणेश निंबाळकर यांचे देवळा तालुक्यात प्रचंड शक्ती प्रदर्शन; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

याप्रसंगी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला

प्रथम सरस्वती पुजन आणि दिप प्रज्वलन मुख्याध्यापक एस. के. सावंत आणि शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परीचय करून दिला. याप्रसंगी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी सोपान देवरे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Deola-Chandwad | चांदवड-देवळा तालुक्यातील बड्या नेत्यांची चांदवड देवळा विकास आघाडी; तोलामोलाचे नेते नानांसोबत

मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी सोपान देवरे, गुलाब आहिरे, विकास सावंत, सविता मांडवडे आदींसह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतातुन अनेक गमती जमती पासून ते सुख दुःखाच्या बाबीं अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्नेह-भोजनाचा आस्वाद घेतला. मेळाव्यास एस. के. सावंत, आर. एम कापडणीस, एम. एन. आहेर, ई. एम. सावळा, लिपिक एस. जे सावंत, डी. ए. ठाकरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार माजी विद्यार्थी गुलाब आहिरे यांनी मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here