Deola | प्रहार उमेदवार गणेश निंबाळकर यांचे देवळा तालुक्यात प्रचंड शक्ती प्रदर्शन; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
51
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गणेश निंबाळकर यांनी देवळा तालुक्यात प्रचंड शक्ती प्रदर्शन करत रॅलीच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील गावांमध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात करत मतदारांचा प्रतिसाद मिळवला.

Deola | श्रावण बाळ संस्थेची बांधिलकी; दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

दुर्गा माता मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात

माघारीनंतर दुसऱ्याच दिवशी देवळा शहरातील दुर्गा माता मंदिरात प्रचाराचे नारळ फोडून सुरवात करण्यात आली. शहरातील व्यापारी पेठ, उपनगरामधुन आपल्या असंख्य समर्थकांसह मतदारांच्या गाठी भेट घेत पायी रॅलीद्वारे त्यांनी प्रचाराची सुरवात केली. त्यांनतर तालुक्यातील भिलवाड, मांजर वाडी, कापशी, भावडे, मकरंद वाडी, रामेश्वर, गुंजाळ नगर, देवळा, मटाने, वाजगाव, वडाळा, कांचने, कणकापूर, शेरी, वार्षि, हनुमंत पाडा, मुलुख वाडी, खर्डे या गावांमध्ये प्रचाराचा झंझावात करत मतदारांचे लक्ष वेधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपली उमेदवारी असून, यासाठी आपणास मतदान करण्याचे आवाहन त्यांनी गावागावात केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here