सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावरील भावडबारी घाट ते रामेश्वर फाटा रस्ता गेल्या सात महिन्यांपासून महामार्गालगतच्या जमीन अधिग्रहण संदर्भात संभ्रमात असल्याने रस्त्यांचे काम रखडले आहे. यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी पैसे भरले होते, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोजणीला भूमिअभिलेख कार्यालयाकडून गेल्या तीन दिवसांपासुन सुरुवात करण्यात आली असून, यात शेतकऱ्यांची जमिनीची हद्द कायम झाल्यानंतर लवकरच महामार्गाचे काम सुकर होण्याचा मार्ग दिसत आहे. या महामार्गावरील रामेश्वर, सुभाष नगर व भावडे या शिवारातील रस्त्यालगतच्या २० ते २५ शेतकऱ्यांच्या गटांच्या मोजणीला दि. २३ पासून सुरुवात करण्यात आली असून, पावसाच्या अपव्यय आल्याने बुधवारी मोजणी थांबविण्यात आली. पाऊस उघडल्यावर मोजणी पूर्ववत सुरु होऊन, उर्वरित शेतकऱ्यांच्या गटांच्या मोजणी पुढील महिन्यात केली जाणार आहे.
Deola | संघाच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ सभासदांन पर्यंत पोहचवणार- योगेश आहेर
प्रवाशांच्या जीवाशी खेळ कधीपर्यंत सुरू राहणार?
मागील महिन्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असताना संबंधित शेतकऱ्यांनी रास्तारोको करत काम बंद पाडले होते. यात शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी मध्यस्थी करत पालकमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी जलल शर्मा यांचे समवेत शेतकरी व संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे ठोस आस्वासन दिले होते, त्यानंतर त्यांनी पालकमंत्री भुसे व जिल्हाधिकारी जलल शर्मा यांनी शेतकरी शिष्टमंडळाची भेट घालून दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी अती तातडीने मोजणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. भावडबारी घाट ते रामेश्वरफाटा या सात किमी रस्त्याचे अवघे सहा मीटर रूंदीचे काँक्रिटीकरण झाले असून त्यावर शेकडो वाहनांची वाहतूक चालू आहे. उर्वरित दुसऱ्या बाजूचे सहा मीटरचे काम शेतकऱ्यांनी हरकती घेतल्यामुळे सात महिन्यापासून बंद असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, याठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत. हा प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ किती दिवस सुरू राहणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
या मार्गावर सणासुदीमुळे वाहतूकिची वर्दळ वाढणार असून, रस्त्यावर काही ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत, खड्ड्यातुन मार्गक्रम करतांना अनेक वाहने रस्त्यावर नादुरुस्त होतात. त्याचा फटका एसटी मोठ्या प्रमाणावर बसत असून प्रवाश्यांचे प्रचंड हाल होतात. संबंधित प्रश्नांवर आमदार, खासदार गप्प का?असा संतत्प सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अतिरिक्त कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची मागणी
भूमिअभिलेख कार्यालयात अत्यल्प कर्मचारी वर्ग असून याकामी लगतच्या कळवण, सटाणा, चांदवड तालुक्यातील भूमिअभिलेख विभागातील कर्मचारी उपलब्ध करून दिले. तर सदरचे काम लवकर पूर्ण होईल व शेतकऱ्यांचे समाधान होऊन महामार्गाचे काम सुरळीत होण्यास मदत होईल, याबाबत जिल्हा भूमीअभिलेख यांनी प्रश्नांची गंभीरता लक्षात घेत अतिरिक्त कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“गेल्या तीन दिवसांपासून पैसे भरलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भावडे येथून मोजणीला सुरुवात झाली असून मोजणीला बुधवारी आलेल्या पावसामुळे अपव्यय आला. पाऊस उघडल्यावर मोजणी पूर्ववत सुरु होणार आहे . रस्त्याच्या कामाला आमचा विरोध नसून, आम्हाला आमच्या जमिणींचा मोबदला मिळायला हवा.”
डॉ. हरिचंद्र आहेर,शेतकरी, भावडे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम