Nashik Crime | खाजगी सावकाराने सव्वा लाखावर, आठ लाखांचे व्याज उकळले

0
45
#image_title

Nashik Crime | खाजगी सावकाराकडून व्याजाने सव्वा लाख रुपये घेऊन त्या मोबदल्यात तब्बल आठ लाख रुपये उकळणाऱ्या सावकारी कुटुंबावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्ज घेतलेल्या व्यक्तीला कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सावकाराने “तुझ्या पत्नीला मी सांभाळेन” असे म्हटल्याने कर्जदार मंगळवारी दुपारी थेट पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे मदतीसाठी धावून घेतली. त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितल्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने संशयित खाजगी सावकार सुनील महाजन, त्याची पत्नी जोत्सना आणि दीपक महाजनसह त्यांच्या चुलत सासऱ्यावरही कार्यवाही करण्यात आली आहे.

Nashik Crime | धक्कादायक! चांदवडमध्ये दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने हल्ला

2016 मध्ये घेतलं होतं कर्ज

मंगळवार 24 सप्टेंबर रोजी दशरथ पंडित साबळे यांनी याबाबत खंडणी व अवैध सावकारी अधिनियमा अन्वये फिर्याद दाखल केली. दशरथ साबळे हे पत्नी व मुलींसह रामनगर, गंगापूर रोड येथे वास्तव्यास असून हॉटेलमध्ये वेटर आहेत. मार्च 2016 मध्ये त्यांनी आर्थिक अडचणीतून तोंड ओळखीतील सुनील महाजन यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये, दहा टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. या दरम्यान या व्याजाची आकारणी करून सन 2016 पासून आजपर्यंत तब्बल आठ लाख 45 हजार रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात साबळे यांच्याकडून वसूल करण्यात आले.

Nashik Crime | धक्कादायक! मालेगावात झुडपात सापडलं नवजात अर्भक

व्याज पूर्ण झाल्यानंतरही पैशांची मागणी

तर एक लाख तीस हजारांच्या व्याज वसुलीनंतरही महाजनने पुन्हा आठ लाख रुपये बाकी असून ते द्यावे लागतील असा तगादा लावला होता. एवढेच काय त्यांनी साबळे यांच्या घरी येऊन वारंवार शिवीगाळही केली आणि पैसे न दिल्यास जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील दिली होती. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुशील जुमडे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील या संपूर्ण घटनेचा तपास करीत असून संशयीत सुनील महाजन हा पोलीस असल्याचा संशय असल्याने सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या ७२७६०१९७६६ या क्रमांकावरून साबळेंना धमक्या दिल्या जात असून हा क्रमांक एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here