सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी गतीने शिकतो त्यामुळे शिक्षणात संगणक हा महत्वाचा घटक आहे. असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका (स्व.) सुशिला सूर्यवंशी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ए-बी एनजीओ मुंबई कॉम्प्युटर शिक्षा व जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने तालुक्यातील दहा प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी कॉम्प्युटर लॅब्जच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. उमराणे शाळेत झालेल्या कार्यक्रमात सरपंच कमल देवरे अध्यक्षस्थानी होत्या.
Deola | इंजि. राजेंद्र चव्हाण यांची उपविभागीय अधिकारी या पदावर पदोन्नती वर बदली
महाराष्ट्रात सर्वप्रथम देवळा येथे हा उपक्रम राबविण्यात आला
या शाळांमधील कार्यक्रमप्रसंगी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, राज्य बँक असोसिएशनचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, बाजार समितीचे प्रशांत देवरे, विलास देवरे, शिक्षण विस्ताराधिकारी किरण विसावे, केंद्रप्रमुख पी.के.आहेर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्रात सर्वप्रथम देवळा तालुक्यात हा उपक्रम घेतला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी हनुमाननगर (सावकी) शाळेतील कल्याणी आहेर हिने मनोगत व्यक्त करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
Deola | देवळा तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
दहा प्राथमिक शाळांमध्ये अत्याधुनिक लॅब्ज सुविधा उपलब्ध
एकेका लॅब्जमध्ये प्रत्येकी पाच संगणक, मॅजिक बॉक्स ज्यात १ ते ८ चा पाठ्यक्रम तसेच इतरही संगणक साहित्याचा समावेश आहे. दहा प्राथमिक शाळांमध्ये अशा अत्याधुनिक लॅब्ज तयार करण्यात आल्या आहेत. त्यात लोहोणेर, निंबोळा, उमराणे, चिंचवे, हनुमाननगर, मटाणे, वरवंडी, विद्यानिकेतन देवळा, प्राथमिक मुलींची शाळा देवळा व मुंजवाड यांचा समावेश आहे. अनंत देवरे व या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी कार्यक्रमांचे संयोजन केले.
“डॉ.विजय सूर्यवंशी व त्यांच्या सूर्यवंशी परिवाराने दिलेल्या या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुसज्ज कम्प्युटर्स लॅब आल्या आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्य वेधी शिक्षण घेऊन जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील.” – नितिन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
“शेतकरी व ग्रामीण कुटुंबातील मुलांना कम्प्युटर लॅब व ईलर्निंग माध्यमातून आमच्यासारख्या सामान्य मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाची दारे उघडी करून दिली.” – आकाश कडनोर इयत्ता दहावी, विद्यानिकेतन देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम