सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील इ. व. द.चे शाखा अभियंता इंजि. राजेंद्र चव्हाण उर्फ दाढीवाले रावसाहेब यांना उपअभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या निवडसुची प्रमाणे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट-अ मधील उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) या पदावर सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) उपविभाग क्रमांक ३ कळवण येथे पदोन्नतीने पदस्थापना मिळाली.
Deola | देवळा तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
इंजि. राजेंद्र चव्हाण यांना जि.प.त. टेपवाले रावसाहेब अशी उपाधी
इंजि. राजेंद्र चव्हाण यांनी शासकीय कामकाज करतांना एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी, समाजाचे आपण देणं लागतो ही भावना त्यांनी मनापासून ठासून ठेवलेली होती. त्यामुळे त्यांचा असंख्य चाहता वर्ग आपोआप निर्माण झाला. त्यांना जि.प.त. टेपवाले रावसाहेब अशी उपाधी आहे.
Deola | देवळ्यात अवैधरित्या गावठी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; 68 हजार 290 रुपयांचा अवैध साठा जप्त
सर्व पदाधिकारी व अधिकारी वर्गाकडून सत्कार
त्यांना मिळालेल्या पदोन्नतीचे देवळा, कळवण, सुरगाणा, सटाणा तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी, पत्रकार, अधिकारी वर्ग, ठेकेदार, सरपंच आणि त्यांचा सहकारी मित्र परिवाराने समाधान व्यक्त केले. त्यांच्या पदोन्नती बद्दल स्थापत्य अभियंता ठाकरे, जाधव, ठेकेदार अनिल आहेर, सचिन आहेर, अमोल सोनवणे, दिनेश जाधव, अजय आहिरे, देवा सावन्त, निलेश आहेर, निलेश सावंत, कौतिक बागुल, भूषण धानमे आदींनी सत्कार केला व पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम