Uddhav Thackeray | विजयादशमी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शिवतर्थावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात “आमचे सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहोत. जसे जय श्रीराम म्हणतो, तसे जय शिवराय हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. तसेच शिवरायांच्या मंदिरात आणि आसपासच्या भागात त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले असतील.” अशी घोषणा केली असून त्याचबरोबर “नरेंद्र मोदी आणि तुमच्या मिध्यांना जसे वाटते, तसे छत्रपती शिवाजी महाराज मत मिळवण्याचे मशीन नाहीत. जो शिवाजी महाराजांच्या मंदिरांना विरोध करेल त्याला शिवरायांचा महाराष्ट्र बघून घेईल.” असे म्हणत राज्य सरकारला इशारा दिला आहे.
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगरच्या भाषणाने वेधलं लक्ष; नेमकं प्रकरण काय?
ठाकरेंचा भाजप आणि संघावर हल्ला
त्याचबरोबर, स्वयंसेवक संघ आणि भाजपावर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता 100 वर्षे पूर्ण होत आहेत. मला सांघाबद्दल आदर आहे, मोहन भागवतांबद्दल देखील आदर आहे. परंतु ते जे काही करत आहेत, त्याच्याबद्दल आदर नाही. मला त्यांना विचारायचे आहे, तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या कोणासाठी सांगत आहात? त्यांनी सांगितले की हिंदूंनो स्वसंरक्षणासाठी एकत्र या. म्हणजे आज जे दहा वर्षांपासून सत्तेत बसले आहेत ते हिंदूंचे संरक्षण करू शकत नाहीत का? आम्हीच आमचा संरक्षण करायचं असेल तर तुमची गरज तरी काय?” असा सवाल विचारत संघावर आणि भाजपावर निशाणा साधला.
एकनाथ शिंदेंवरही घणाघात
“दिल्लीवाल्यांच्या पिढ्या आल्या तरी त्यांना गाडून आपला भगवा फडकवणार. इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून बाळासाहेबांची मशाल बनून या सरकारला आग लावल्याशिवाय राहणार नाही. आपण हिंदुत्वाचा विचार सोडलेला नसून आपण भाजपला लाथ घातली आहे. त्यांच हिंदुत्व बुरसटलेला आहे. जा आणि त्या मिंध्यांना सांगा तुमचे विचार म्हणजे बाळासाहेबांचा विचार नाही. त्यांनी आपल्या जाहिरातीत हिंदुत्व, आमचा श्वास, मराठी आमचा प्राण असे लिहिले, पण त्याच्यापुढे दोन ओळी लिहायच्या राहिल्या. ‘अदानी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वास’ हे शेपूट हलवणारे लोक आहेत, हे लांडगे आहेत.” असा हल्लाबोल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम