सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | लोहोणेर येथील डोन शिवारातील धरण चणकापूर उजव्या कालव्याच्या पूर पाण्याने भरून देण्यात यावे व धरणातील अतिक्रमण काढण्यात येऊन लाभक्षेत्रील शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी देवळा तहसील कार्यालयावर तसेच पोलीस ठाण्यावर अर्ध नग्न अवस्थेत मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रहाराचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी या अर्धेनग्न आंदोलनात सहभाग घेऊन आपला पाठींबा दर्शविला.
Deola | देवळ्यात अवैधरित्या गावठी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; 68 हजार 290 रुपयांचा अवैध साठा जप्त
शेतकरी पाण्यापासून वंचित
निवेदनाचा आशय असा कि, तालुक्यातील मौजे लोहोणेर येथील शेतकरी चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्यापासून वंचित असून, या परिसरातील डोन शिवार धरण क्रमांक २ मध्ये गेल्या ४ वर्षांपासून या कळव्याला सोडण्यात आलेले पूरपाणी टाकण्यात आलेले नाही. याबाबत येथील शेतकऱ्यांनी धरणात पाटबंधारे विभागाकडे पूरपाणी टाकण्यासाठी वारंवार मागणी करून देखील अद्याप धरणात पूरपाणी टाकण्यात आले नाही.
पिकांना अपुरे पाणी
अत्यल्प पावसामुळे पिकांना उन्हाळ्यात पाणी पुरणार नाही. विहिरींची पाण्याची पातळी देखील यावर्षी घटलेली आहे. यासाठी रब्बी पिकांसाठी डोण धरणात तात्काळ पूर पाणी टाकून धरण भरून देण्यात यावे, तसेच या धरणाची व चारीची परिस्तिथी पाहता तेथे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणवर अतिक्रमण झालेले दिसून येत आहे व त्या अतिक्रमणात काही शेतकरी पिकांची लागवड करीत आहेत. तसेच विहिरींचे खोदकाम चालू आहे. त्यामुळे धरणाचे क्षेत्र कमी होत असून तसेच अतिक्रमण केलेले असताना देखील शेतकरी आमची पिके पाण्यात जातील म्हणून धरणात पाणी टाकण्यास अडथळा निर्माण करीत आहेत.
धरण क्षेत्रातील अतिक्रमण हटवावे
अशा शेतकऱ्यांवर देखील कारवाई करून धरण क्षेत्रातील अतिक्रमण काढण्यात यावे. शनिवार दि. १२ पर्यंत धरणात पाणी न आल्यास व उर्वरित मागण्यांची पूर्तता न झाल्यास आम्ही सर्व शेतकरी चणकापूर धरण उजवा कालव्यात येथे जल समाधी घेणार आहोत. याची सर्वस्वी जबादारी संबंधित तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पाटबंधारे विभाग आदींसह संपूर्ण तालुका प्रशासनाची राहील. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या बाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, पोलिस निरीक्षक, मंत्रालयात देण्यात आले आहे.
Deola | खर्डे येथे अटल भूजल योजनेचे ग्रामस्थारावरील प्रशिक्षण संपन्न
यावेळी राजू आहेर, गोरख बागुल, विनोद शेवाळे, विनायक बागुल, किशोर देशमुख, ज्ञानेश्वर बच्छाव, समाधान आहेर, सोपान सोनवणे, योगेश शेळके, सागर आहेर, राहुल राठोड , गणेश राठोड, सागर भालेराव, भाऊसाहेब बच्छाव, सचिन शेवाळे, सचिन शेळके, तुषार शेवाळे, समाधान बच्छाव, गणेश निकम, रमेश निकम, मोहन निकम, संजय निकम, संदीप बच्छाव, गंगाधर आहेर, परशराम आहेर, योगेश आहेर, वैभव आहेर, किरण राठोड, किरण अहिरे, प्रमोद शेवाळे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम