Deola | देवळ्यातील मेशी येथे ट्रॅक्टरच्या रोट्याव्हीटरमध्ये अडकून एकाचा मृत्यू

0
22
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | ट्रॅक्टरच्या रोट्याव्हीटरमध्ये अडकून एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मेशी ता. देवळा येथील यशवंत भिला शिरसाठ (३३) हा युवा शेतकरी आखतवाडे ता. बागलाण येथे काकाच्या येथे शेतात रोट्याव्हीटर मारण्यासाठी गेला असता त्याचा रोट्याव्हीटरमध्ये अडकून दुर्दैवी अंत झाला.

Deola | खर्डे येथे दत्त जयंती निमित्त शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताह

जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल

याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोनवणे करीत आहेत. यशवंतच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, एक भाऊ, भावजाई असा परिवार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here