सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | हेरिटेज एज्युकेशन अँड कम्युनिकेशन सर्विस यांनी डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर कर्वेनगर पुणे, येथे इंटॅक नॅशनल हेरिटेज प्रश्नमंजुषा 2024 स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत इंटरनॅशनल स्कूल भावडे येथील नाशिक इंटेक चॅप्टर मधून भार्गव जाधव व रुद्राक्ष सोनवणे यांची राज्य अंतिम फेरीसाठी निवड झाली.
Deola | पिंपळगाव (वा.) जनता विद्यालयात संविधान दिन साजरा…
एस. के. डी. स्कूलचा संघ दुसऱ्या क्रमांकावर विजयी
सदर स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधित्व करत असलेला एस. के. डी. स्कूलचा संघ दुसऱ्या क्रमांकावर विजयी झाला. सदर स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, वाई, सोलापूर आणि नागपूर येथून एकूण सहा शाळांनी सहभाग नोंदविला होता. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भारताचा वारसा, भारतीय इतिहास, औद्योगिकीकरण वाहतूक आणि दळणवळण, इतिहासातील महिला या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले.
Deola | कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात संविधान दिन साजरा
विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा
स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या शिक्षिका कावेरी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे प्राचार्य एस. एन. पाटील संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे, सागर कैलास यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम