सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि २६) रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर हे होते.
Deola | खर्डेत आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विजयाचा जल्लोष
संविधान साक्षर होणे आज गरजेचे आहे
यावेळी प्रमुख वक्ते डॉ. संजय बनसोडे म्हणाले की, “भारताच्या संविधानाला पंचाहत्तर वर्ष झाली आहेत. तरी ते आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत सुसंगत आहे. आज भारताला संविधान स्वीकृत करुन 75 वर्ष झाली तरी भारतातील बरीचशी जनता संविधान निरक्षर आहे ती संविधान साक्षर व्हावी ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व महापुरुषांच्या विचारांचा भारत निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन जगातील सर्वात मोठा लिखित स्वरुपातील ग्रंथ निर्माण केला. तो म्हणजे ‘भारतीय संविधान’.
हे भारतीय संविधान आपली राज्यपध्दती नसून जीवन पद्धती आहे. असा विचार करुनच आपण संविधान वाचले पाहिजे. त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तरच आपले घडणारे पुढील आयुष्य अधिक समृद्ध होईल. आज आरक्षण हा मुद्दा खूप गाजतो आहे. पण आरक्षण म्हणजे सवलत नसून ‘प्रतिनिधित्व’ आहे. सर्वांसोबत समानतेने जीवन जगता यावे शिक्षणाची समान संधी मिळावी म्हणूनच त्यावेळच्या मागास असलेल्या जातींना आरक्षण दिले गेले आणि आज आपण बघतो आहोत. आरक्षण हा राजकीय मुद्दा होऊन समाजामध्ये द्वेष निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजताना सर्व राजकीय पक्ष दिसत आहेत. म्हणूनच संविधान साक्षर होणे आज गरजेचे झाले आहे.” असे प्रतिपादन डॉ. बनसोडे यांनी केले.
Deola | देवळ्याच्या जनतेचा दादांना कौल; 52 हजार मतांनी राहुल आहेर आघाडीवर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमित बोरसे यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य व रासेयो नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. डी. के.आहेर, जे. आर. भदाणे, व्ही. डी. काकविपुरे विविध विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते. प्रा. सी.बी. दाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम