Dadaji Bhuse | वाहन बाजार डीलर असोसिएशनच्या वतीने मंत्री दादाजी भुसे यांचा सत्कार

0
37
Dadaji Bhuse
Dadaji Bhuse

नाशिक : रिक्षा पासिंगसाठी प्रतिदिन विलंब शुल्क 50 रुपये ठोठावण्यात आलेला दंड माफ करण्याचा निर्णय सरकारच्या वटईनी घेण्यात आला असून, सरकारच्या वतीने पालकमंत्री दादाजी भुसे यांनी या निर्णयाची विधिमंडळात घोषणा केली. विलंब शुल्क सरसकट माफ करण्याच्या या निर्णयामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाल्याने नाशिकमध्ये रिक्षा चालकांनी पेढे वाटून हा आनंद साजरा केला होता. याच पार्श्वभूमीवर आज मंत्री दादाजी भुसे यांचे आभार मानण्यासाठी ‘युज व्हेईकल डीलर असोसिएशन’ नाशिक यांचे पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी मंत्री भुसे यांचा सत्कार करत आभार मानले.

“रिक्षा चालक हा अतिशय प्रामाणिक मनुष्य आहे. हातावर पोट असणाऱ्या गरजू रिक्षा चालकांबाबत सरकारने तातडीने निर्णय घेत दिलासा दिला. कारण चालकांच्या प्रामाणिकपणाची जाणीव सरकारला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ऑटो रिक्षा तसेच टॅक्सी चालकांचा करोडो रुपयांचा विलंब शुल्क माफ करण्यात आला आहे. रिक्षा चालक असो किंवा अन्य व्यावसायिक चालक हे खूप कष्ट करून उदरनिर्वाह करतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री भुसे यांनी केले.

Dadaji Bhuse | नाशिक रिंग रोडच्या कामाला गती देण्याचे मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

Dadaji Bhuse | रिक्षा चालकांच्या हितासाठी सरकारकडून महामंडळाचीही स्थापना 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा चालवला आणि मेहनत करुन आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. रिक्षा चालकांच्या समस्या व अडचणी मुख्यमंत्र्यांना माहिती आहेत. त्यामुळेच रिक्षा चालकांच्या हितासाठी राज्य सरकारकडून महामंडळ देखील स्थापन करण्यात आले. या महामंडळाच्या माध्यमातून रिक्षाचालक आणि त्यांच्या परिवारासाठी पॉलिसी आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यापुढे रिक्षा चालक आणि त्यांच्या परिवाराची जबाबदारी, त्यांच्या मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचारांचा खर्च ही सगळी जबाबदारी सरकार घेणार असल्याचे देखील मंत्री भुसे यांनी सांगितले.

येणाऱ्या काळात राज्यात ई-रिक्षा आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांचे इंधन, मेंटेनन्स याची बचत होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. रिक्षा किंवा ऑटोरिक्षा हे सर्वसामान्य लोकांचे वाहन आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा त्या समस्येवर उपाय शोधताना या रिक्षाचा जन्म झाला. यामुळे सर्वसामान्यांसाठी रिक्षा चालक असो वा दुसरा चालक असेल हा महत्वाचा भाग असल्याचे मत मंत्री भुसे यांनी व्यक्त केले.

Dadaji Bhuse | शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; मंत्री भूसेंचे कृषी विभागाला निर्देश

यावेळी आर. डी धोंगडे, शाम साबळे, शिवाजी भोर, विष्णू सूर्यवंशी, शाशिभाऊ उन्हवणे, भाऊसाहेब जाधव, विनोद चोरडिया, किरण पवार, प्रफुल्ल बोंडे, सागर करपे, पंकज बोराडे, पप्पू पाटील, सुनील बैरागी, संतोष देशमुख, शंकर माळी, सुशील शिंदे, पंकज घोटेकर, राजेश पाटील, नाझिम खान, आय्यास काझी, भावडू पाटील, गणेश कदम, विनोद पांडव, राहुल कुलकर्णी, शरद येवलेकर, योगेश बोरसे, दादाजी शेलार सर्वच वाहन बाजार डीलर उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here