Dadaji Bhuse | नाशिक रिंग रोडच्या कामाला गती देण्याचे मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

0
37
Dadaji Bhuse
Dadaji Bhuse

मुंबई :  उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेले नाशिक हे एक औद्योगिक आणि धार्मिक केंद्रही आहे. नाशिक शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आगामी काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्ग (नाशिक रिंग रोड) प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

नाशिक परिक्रमा मार्ग (नाशिक रिंग रोड) प्रकल्पाची सद्य:स्थिती, सादरीकरण आणि आढावा बैठक मंत्री भुसे यांच्या दालनात आज दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक विकास महानगर प्राधिकरणाचे आयुक्त सतीश खडके, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते, वर्षा अहिरे- पवार, कार्यकारी अभियंता रंजना दळवी, महाव्यवस्थापक दत्तप्रसाद नडे, विलास कांबळे, कार्यकारी अभियंता प्रा. नि. नाईक, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एम. डी. शेख आदी उपस्थित होते.

Dadaji Bhuse | शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; मंत्री भूसेंचे कृषी विभागाला निर्देश

यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, नाशिकच्या नागरिकरणात वेगाने वाढ होत आहे. मुंबई, पुणे मार्गाने होणारी वाहतूक शहरातून जात असल्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचे प्रश्न निर्माण होत आहेत. नाशिक शहरातील वर्दळ, रस्ते, बाहेरून येणारी वाहतूक व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा होणारा परिणाम पाहता नाशिक शहरात येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक शहराबाहेरून वळविणे आवश्यक आहे.

नाशिक शहरातून नाशिक- पुणे, नाशिक- वलसाड, मुंबई- नाशिक, नाशिक- मालेगाव हे महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात. या मार्गावरील सर्व प्रकारची आंतरराज्य वाहतूक तसेच राज्यांतर्गत वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक शहरात येणारी सर्व प्रकारची वाहतूक शहराबाहेरून नाशिक परिक्रम मार्गाने (रिंग रोड) वा जलद निर्गमन मार्गाने वळविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रस्तावित परिक्रमा मार्ग हा ६५.४१ किलोमीटर लांबीचा असून प्रस्तावित रुंदी ६० मीटर एवढी आहे. त्यासाठी ४००.९३ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यासाठी अंदाजित २६०४.४३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. प्रस्तावित नाशिक परिक्रमा महामार्गासाठी विविध पर्याय आखणीचा सविस्तर अभ्यास करून इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार श्रेयस्कर पर्यायी आखणी अंतिम करण्याबाबतची कार्यवाही प्रगती पथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Dada Bhuse | खचून जाऊ नका सरकार तुमच्यासोबत; तातडीने पंचनामा करण्याचे मंत्री भुसेंचे निर्देश


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here