Bacchu Kadu | बच्चू कडू विधानसभेपूर्वी मविआत जाणार..?; काँग्रेसच्या बड्या नेत्याने घेतली जबाबदारी

0
18
Bacchu Kadu
Bacchu Kadu

Bacchu Kadu :  राज्यातील अनेक तहसील आणि सेतु कार्यालयांवर महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेच्या नोंदणीसाठी महिलांची तौबा गर्दी होत आहे. मात्र, दुसरीकडे अनेक ठिकाणी या योजनेच्या नोंदणीसाठी महिलांकडून जास्तीचे पैसे आकरले जात असल्याचे प्रकारही समोर येत आहे. असाच एक प्रकार अमरावतीमधून समोर आला होता. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी आलेल्या महिलांची लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकिस आला होता. याबाबतचा एक व्हीडियोही व्हायरल झाला असून, याप्रकरणी आमदार बच्चू कडूंनीही (Bacchu Kadu) खेद व्यक्त केला आणि कारवाईची मागणी केली.

Bacchu Kadu | बच्चू कडू मविआत येणार, मी त्यांना घेऊन जाणार

यावेळी बच्चू कडू मध्यमांशी बोलत असताना काँग्रेसचे आमदार तथा कोल्हापूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे तिथे आले आणि “आमदार बच्चू कडू हे लवकरच महाविकास आघाडीत येणार आहेत आणि त्यांना मी घेऊन जाणार आहे, अशी टिप्पणी केली. दरम्यान, या वक्तव्यानंतर दोन्ही नेते आणि उपस्थितांमध्ये हसा पिकला.

मात्र, बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याचे अनेकवेळा दिसून आले. त्यांनी भाजपच्या नवनीत राणा यांच्या विरोधातही आपला उमेदवार दिला होता. एवढंच नाहीतर त्यांनी नवनीत राणा यांना पाडण्यासाठी दंड थोपटले होते.यापूर्वीही त्यांनी अनेक भाजपविरोधी वक्तव्य केली असल्याने ते महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे स्टेज पाटलांचे हे वक्तव्य आगामी काळात विधानसभा निवडणुकांमध्ये खरे होणार का..? हे पहावे लागणार आहे. (Bacchu Kadu)

Bacchu Kadu | नवनीत राणांचा प्रचार नाही, पराभव करणार; बच्चू कडू कडाडले

राहुल गांधींच्या व्यक्तव्यावरून विधानपरिषदेत वाद 

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, आज य अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. दरम्यान, संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानावरून वातावरण चांगलेच तापलेले असून, त्याचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात या मुद्द्यावरून वाद झाले. यावेळी अंबादास दानवेंनी लाड यांना शिवीगाळ केली, असे आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले. यानंतर काल अखेर निलम गोऱ्हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आवाजी मतदानाने निलंबन केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. (Bacchu Kadu)

Bacchu kadu : आणि म्हणून मला गुवाहाटीला जावं लागलं ; नाराज बच्चू कडूंनी बोलून दाखवली मनातली खदखद


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here