Dadaji Bhuse | आठ दिवसात रिझल्ट द्या अन्यथा कारवाई; मंत्री भुसेंनी यंत्रणेला खडसावले

0
77
Dadaji Bhuse
Dadaji Bhuse

Nashik-Mumbai Highway |  नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न हा गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असून, काल मंगळवार दि.23 रोजी शिवसेना ठाकरे गटाने याविरोधात घोटी टोलनाक्यावर आंदोलन केले. नाशिक-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची समस्या निर्माण होत असून, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होतो. दरम्यान, या समस्येची तातडीने दखल घेत राज्याचे सर्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज तातडीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना या प्रकरणी धारेवर धरले.

या महामार्गावर नाशिकपासून ठाणेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, पावसाळ्यामुळे या मार्गावर खड्डे निर्माण झाले असल्याने खड्डे बुजवणे, मार्गावर पुन्हा खड्डे  होणार नाही याची काळजी घेणे, आणि या भागातील पूलांची चालू कामे लवकर मार्गी लावण्याबाबत निर्देश मंत्री भुसे यांनी संबंधित विभागाला दिले. (Nashik-Mumbai Highway)

आसनगाव रेल्वे पूलाचे काम प्रलंबित असून, त्यासाठी आणखी 3 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने अस्तित्वात असलेल्या पुलाची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय झाला असून, जिंदाल कंपनीजवळील फ्लायओवरचे काम, परिवार गार्डनजवळील पूल, इगतपुरी जवळील समृद्धी महामार्गाकडे जाणारा रस्ता, याबाबतही या बैठकीत चर्चा झाली आणि याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री दादाजी भुसे याणी अधिकाऱ्यांना दिले. (Dadaji Bhuse)

Dadaji Bhuse | नाशिक रिंग रोडच्या कामाला गती देण्याचे मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

प्रलंबित पूलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून याठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घेणे. जड वाहनांना शहरात येणे-जाणे यासाठी वेळेचे बंधन लागू करण्यात आले आहे. ठाणेपासून वडपेपर्यंत ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला 170 पोलिस मित्र देण्यात आले असून, त्यांना प्रभावी काम करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. कोणती वाहने कोणत्या लेनमध्ये चालली पाहिजे. जड वाहनं दुसऱ्या तिसऱ्या लेनमध्ये, लाहक वाहनांसाठी पहिली लेन खुली ठेवणे, याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आदेश देण्यात आले.

Dadaji Bhuse | येत्या 8 दिवसांत रिजल्ट दिसायला हवा

या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या 8 दिवसांत रिजल्ट दिसायला हवा, असे कठोर आदेश मंत्री भुसे यांनी दिले असून, जर आठ दिवसांत याचे प्रभावी परिणाम दिसून आले नाही. तर, त्या भागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, या शब्दांत दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले आहे. तसेच ट्रॅफिक आणि रस्ते समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून, यासाठी नागरिकांनीही सहकार्य भूमिका करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

Dadaji Bhuse | वाहन बाजार डीलर असोसिएशनच्या वतीने मंत्री दादाजी भुसे यांचा सत्कार


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here