सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील डॉ.राकेश घोडे आणि वाणिज्य विभागाचे डॉ.दिपिका शिंदे व प्रा.चंद्रकांत दाणी यांनी विभागप्रमुख जयवंत भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वित्तीय संस्थांच्या आर्थिक व्यवहारांसाठी बिग डेटा ॲनालिटिक्स प्रोसेसिंग सर्व्हर’ या उपकरणाचे डिझाईन तयार करून भारत सरकारच्या बौद्धिक संपदा तथा पेटंट विभागाकडे परिक्षण व मान्यतेसाठी सादर केले होते. ज्याला नुकतीच मान्यता व प्रमाणपत्र मिळाले आहे.
प्रस्तावित डिझाईनची रचना ही मोठ्या प्रमाणात डेटा असलेल्या वित्तीय संस्थांच्या गुंतागुंतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली गेली आहे. आर्थिक व्यवहारांच्या क्षेत्रामध्ये सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची चिंता आहे आणि संवेदनशील डेटाचे रक्षण करण्यासाठी तयार केलेले हे डिव्हाइस, सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश आणि सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी आणि एन्क्रिप्शन तसेच घुसखोरी शोध प्रणालीत एकत्रितपणे कार्य करू शकते.
Deola | आहेर महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा
शक्तिशाली हार्डवेअर, प्रगत विश्लेषण सॉफ्टवेअर, कडक सुरक्षा उपाय आणि स्केलेबिलिटी एकत्र करून, मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहार डेटाचे कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे प्रक्रिया आणि विश्लेषण करण्याच्या जटिलतेवर नेव्हिगेट करण्यासाठी आवश्यक साधनांसह असलेले प्रस्तावित डिव्हाईस वित्तीय संस्थांना उपयुक्त ठरणार असल्याचे या चमूने सांगितले.
महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागाला यापूर्वीही पेटंट प्राप्त झालेले आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडल्याचे देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी सांगितले. या सर्व प्राध्यापकांचे संस्थेच्या सेक्रेटरी प्रा.डॉ. मालती आहेर, प्रशासनाधिकारी बी.के.रौंदळ, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.रावसाहेब शिंदे यांनी कौतुक केले आणि सर्व महाविद्यालयीन घटकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Deola | आहेर महाविद्यालयाच्या खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेत निवड
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम