सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात लोकसंख्या मंडळ आयोजित जागतिक लोकसंख्या दिन गुरुवारी दि. ११ रोजी साजरा करण्यात आला. लोकसंख्या दिन साजरा करण्याचा उद्देश पार्श्वभूमी व लोकसंख्या वाढीमुळे जाणवणार्या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे वडनेर भैरव महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल भगत हे उपस्थित होते.
Deola | महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना देवळाच्या देवळा तहसील येथे आंदोलन
यावेळी भगत यांनी “लोकसंख्या वाढीचा जागतिक कल” याविषयी माहिती सांगताना वर्षानुवर्षे लोकसंख्या कश्या पद्धतीने वाढत गेली. त्याचा नैसर्गिक पर्यावरणावर झालेला परिणाम तसेच त्याचा साधन संपत्तीवर होणारा परिणाम व भविष्यकाळात कशा पद्धतीने साधन संपदा वाढवता येईल. याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ हितेंद्र आहेर, उपप्राचार्य डॉ. डी. के आहेर, डॉ. व्ही. के. वाहुळे, डॉ.डी.एम.सुरवसे आदींसह सर्व प्राध्यापक विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.गरुड यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा.नितीन शेवाळे यांनी केले. आभार प्रा. शुभम मोरे यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम