Deola | एसकेडी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘टीएलम दिवस’ साजरा

0
30
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  एसकेडी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘टीएलम दिवस’ साजरा करण्यात आला. सीबीएसईच्या ‘शिक्षा सप्ताह’ मार्गदर्शक सूचीनुसार विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. टीएलम दिवसाचे सर्व उपक्रम मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरे करण्यात आले. सर्व विषयांच्या अध्ययनाचे आनंदाने प्रात्यक्षिकांसह विद्यार्ध्यांनी एक अद्भुत अनुभव घेतला. देवी सरस्वतीला मानवंदना देऊन टीएमल मानचिन्हाचे उद्घाटन करून दिवसाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता शाळेच्या आवारात प्रदर्शित करण्यात आल्या.

Deola | देवळा महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या डिझाईन पेटंटला सरकारकडून मान्यता

नाविन्यपूर्ण प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केले. इंग्रजी, हिंदी आणि मराठीतील कथा विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आल्या. शिकण्याच्या मजेदार अनुभवात अनियमित क्रियापद शिकण्यासाठी लुडो गेम लहान मुले मनसोक्त खेळले. विद्यार्थ्यांना शाब्दिक कोडे विचारण्यात आले. विषयानुरूप माहिती मिळण्यासाठी विविध तक्ते तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सखोल शिक्षणाच्या वातावरणासाठी टीएलएम स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी पवार यांनी केले तर आभार शितल निकम यांनी मानले. मेळावे, कार्यशाळा, परिसंवाद, प्रात्यक्षिकांसह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्ज्वला भामरे, पूनम सावंत, अभिजित रणदिवे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमास संस्थापक संजय देवरे, सचिव मीना देवरे यांनी शुभेच्छा दिल्या.

Dadaji Bhuse | आठ दिवसात रिझल्ट द्या अन्यथा कारवाई; मंत्री भुसेंनी यंत्रणेला खडसावले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here