Dada Bhuse | निवडणुकीच्या तोंडावर युतीत बिनसलं; व्हायरल व्हिडिओने पालकमंत्र्यांच्या चिंतेत वाढ

0
152
#image_title

Dada Bhuse | नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असून त्यांच्याच मतदारसंघातील एका सहकाऱ्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओची सध्या मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगली चर्चा आहे. नुकताच पालकमंत्री दादा भुसे यांचा जवळचा सहकारी त्यांना सोडून गेला. अशातच आता त्यांना नव्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. त्यांच्याच मतदारसंघात सहकारी भाजपकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून सध्या वाऱ्याच्या वेगाने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडूनही त्या व्हिडिओला पाठिंबा मिळत असल्याने मंत्री भुसेंच्या चिंतेत वाढ झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे समर्थक व कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत.

Dada Bhuse | मालेगावातील आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळणार; दादा भूसेंच्या पाठपुराव्याला यश

काय आहे हा व्हायरल व्हिडिओ? 

व्हायरल व्हिडिओमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांच्या भावना दुखावल्या असल्याचे निदर्शनास येत असून “आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पालकमंत्री भुसे यांना कोणतेही सहकार्य करणार नाही. तसेच त्यांच्यापुढे पर्याय उभा केला जाईल.” असा इशारा त्यामध्ये देण्यात आला आहे. “मालेगावात भाजपची बूथ प्रमुख आणि शक्ती प्रमुख अशी मोठी यंत्रणा असून भाजपला मानणारा व पक्ष सांगेल त्याप्रमाणे वागणारा कार्यकर्ता आहे. त्यांचे मतदान आहे. पालकमंत्री भुसे यांना भाजपचे मतदान चालते, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना चालत नाही.” असे म्हणत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

“येत्या निवडणुकीत भाजप काय हे दाखवून देणार”

“दरवेळी निवडणुकीचे कोणतेही काम करताना भाजपाला सावत्र वागणूक दिली जाते. भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जात नाही आणि उमेदवारी हवी असल्यास शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी सक्ती केली जाते. भाजपाचा उमेदवार उभा असल्यास त्याच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार उभा केला जातो. भाजपाच्या कार्यकर्त्याला कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नाही. मोजक्या एक-दोन कार्यकर्त्यांना कंत्राटी देऊन खुश केले जाते. ते दोन कार्यकर्ते म्हणजेच भाजप नव्हे. असे मंत्रांना सुनावले आहे. तेव्हा येता निवडणुकीत भाजप म्हणजे काय हे दाखवून दिले जाईल. असा इशारा या व्हिडिओ मधून देण्यात आला आहे भाजपच्या विरोधात षड्यंत्र करणारे पालकमंत्री भोसेंच्या प्रचारात कोणीही सहभागी होणार नाही. त्यांच्या पालखीला भाजपचा एकही कार्यकर्ता नसेल.” असे म्हणत थेट इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Dada Bhuse | ‘या’ तारखेपर्यंत लाडकी बहिणीचे अर्ज भरता येणार; दादा भुसेंचे महिलांना आवाहन

भाजप नेते सुनील गायकवाड यांची प्रतिक्रिया

दरम्यान, ‘सरकारनामा’च्या वृत्तानुसार या व्हिडिओची वाच्यता भाजप नेते सुनील गायकवाड यांच्याशी केली असता त्यांनी “हा व्हिडिओ मी पाहिला आहे.” असे सांगत “त्या व्हिडिओतील भावना अगदी खऱ्या असून त्या दृष्टीने भाजपचे समर्थक आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यंदा कोणत्याही परिस्थितीत भाजप आपली ताकद पालकमंत्र्यांना दाखवून देण्याच्या मनस्थितीत आहे.” असे सांगितले. मालेगाव शहर व बाह्य मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना या शीर्षकांतर्गत हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून “महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांना सहकार्य केले जात नाही, मग महायुती फक्त विधानसभा निवडणुकीसाठी असते का? युतीचा धर्म भाजपनेच पाळायचा का? यावेळी तसं होणार नाही.” असा थेट इशारा या व्हिडिओतून देण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांकडून नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here