Dada Bhuse | शबरी आदिवासी घरकूल योजना अंतर्गत मालेगाव तालुक्यात नवीन 3000 घरांना मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामुळे मालेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून मंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मोठ्या संख्येने घरकुलांना मंजुरी मिळाल्यानंतर काही अंशी अनुशेष भरून निघाला असून तालुक्यातील घरांचा प्रश्न निकाली निघणार आहे. भविष्यात देखील नवीन घरकुलांसाठी पाठपुरावा करून तालुक्यातील एकही आदिवासी बांधव योजनेपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
मंत्री विजयकुमार गावित यांचे मानले आभार
तालुक्यातील अनेक आदिवासी बांधव या घरकुल योजनेपासून वंचित असल्याने मंत्री दादाजी भुसे यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा अनुशेष भरून काढण्यासाठी वाढीव घरांना मंजुरी मिळवली आहे. या मंजुरीनंतर मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आदिवासी विभाग मंत्री विजयकुमार गावीत यांचे आभार मानले आहेत.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातींचे घराचे स्वप्न साकार होणार
आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.
Dada Bhuse | दादा भूसेंनी दुसऱ्यांदा प्रशांत हिरेंना पराभवाची धूळ चारली…
शासनाकडून मान्यता
शबरी आदिवासी घरकूल योजना ग्रामीण भागाकरीता लोकप्रतिनिधी व क्षेत्रीय कार्यालयाकडून उद्दिष्ट उपलब्ध करून देण्याबाबत प्राप्त झालेली मागणी विचारात घेता शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत ग्रामीण भागासाठी उद्दिष्ट निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. २०२४-२५ आर्थिक वर्षामधील शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत ग्रामीण भागासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हानिहाय/प्रकल्प निहाय उद्दिष्ट/लक्षांक निश्चित करण्यास आज रोजी शासन मान्यता देण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम