Dada Bhuse | दादा भूसेंनी दुसऱ्यांदा प्रशांत हिरेंना पराभवाची धूळ चारली…

0
56
#image_title

Dada Bhuse | 2004 च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच दादा भुसे यांची दाभाडी विधानसभा मतदार संघात एंट्री झाली. त्यांनी अपक्ष निवडणुक लढवून माजी मंत्री असलेल्या प्रशांत हिरेंचा पराभव केला आणि हिरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. दरम्यान 209 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नुकताच मतदार संघांचा विस्तार झाल्यामुळे आता दाभाडी विधानसभा मतदारसंघ हा मालेगाव बाह्य मतदार संघ बनला होता. यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत दादा भूसेंनी अधिकृतपणे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली.

Dada Bhuse | २००४ च्या निवडणूकीत ‘राजपुत्राला’ नाकारून ‘शेतकरीपुत्राला’ संधी देत मालेगावच्या जनतेने बदल घडवला

त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे आव्हान होते. या निवडणुकीत दादा भूसेंना 95,137 तर प्रशांत हिरेंना 65,073 मतं मिळाली. तब्बल 30,064 मतांच्या फरकाने दादा भूसेंनी पुन्हा एकदा प्रशांत हिरेंना पराभवाची धूळ चारली. विशेष म्हणजे याही निवडणुकीत त्यांच्या प्रचार सभांना पक्षातील राष्ट्रीय स्तरावरील एकाही मोठ्या नेत्याला न बोलावता त्यांनी ही निवडणुक स्वबळावर लढवली आणि जिंकलीही. तर, या निवडणुकीनंतर जणू भूसेंसमोरील हिरेंचे आव्हान हे जणू संपलेच होते.

आज मंत्री असले तरीही त्यांनी कधीच मालेगावच्या जनतेला अंतर दिले नाही. लोकांच्या सुख दुःखात ते कायम उभे राहत. त्यांच्या जनता दरबारात आलेला व्यक्ती हा निराश होऊन जाणार नाही, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहत. ‘आज करू, उद्या बघू’ नाहीतर आताच अधिकाऱ्यांना सांगून काम ताबडतोब मार्गी लावा, ही भूमिका त्यांची कायम राहिली. जनतेच्या कामांसोबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही आणि म्हणूनच दादा भुसे हे मालेगावच्या जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

Dada Bhuse | शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण असणारे नेतृत्व

विकासकामांना प्राधान्य देणे, कार्यकर्त्यांसाठी, लोकांसाठी कायम उपलब्ध असणे, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे, यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली. त्याचा मोठा फायदा त्यांना 2009च्या निवडणुकीत झाला. भुसे यांनी मालेगावच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला. तसेच संघटनेलाही तळागाळात रुजवण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले. गावोगावी, खेडोपाडी शिवसेनेच्या अनेक शाखा उघडल्या आणि ग्रामीण भागात शिवसेना मजबूत केली. त्यांच्या कामावर प्रभावित होऊन तालुक्यातील युवा शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली. आज मालेगावचा जर पक्षाप्रमाणे विचार केला तर दादा भुसेंना शिवसेनेमुळे नाही तर शिवसेनेला दादा भुसेंमुळे ओळखले जाते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here