Nashik Political | नाशकात शिंदे सेनेची कोंडी; विधानसभेसाठी फक्त दोनच जागा मिळणार?

0
52
#image_title

Nashik Political | विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चा अंतिम फेरीत आल्या असून नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 13 आमदार सत्ताधारी पक्षाबरोबर आहेत. त्यामुळे इथे जागावाटप कसे होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यात महायुतीचं जागा वाटप येत्या एक-दोन दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र निश्चित करताना भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना इथे मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल बोलले जाते आहे.

Nashik Political | नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र; उत्तर महाराष्ट्रासाठी मनसेची रणनीती काय?

नाशकात शिंदे सेनेची कोंडी? 

जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे केवळ 2 आमदार आहेत. त्यामुळे या 2 जागा वगळता अन्य जगांमध्ये महायुतीत शिवसेना शिंदे गटाला वाटेकरी करणे अशक्य आहे. तर सध्या महायुतीच्या जागा वाटपात भाजपकडे 5 विद्यमान आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विद्यमान आमदारांच्या जागा अन्य पक्षाला सोडण्याचे उदाहरण कुठेही घडलेले नसून अशा स्थितीत काँग्रेसकडे असलेली इगतपुरी आणि एमआयएमकडे असलेली मालेगाव शहराची जागा शिवसेना शिंदे गटाला सोडली तरी देखील हा पक्ष विधानसभा निवडणुकीत फारसा परीणाम दाखवेल अशी परिस्थिती नसल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

Nashik Political | नाशकात भाजपला फटका; भाजप नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गट आक्रमक पवित्र्यात लढणार

शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे असलेल्या चांदवड, नाशिकमध्ये आणि इगतपुरीसह अन्य काही मतदारसंघांमध्ये आपला दावा केला आहे. शिंदे गटाने दावा केला तरीही आपल्या मतदारांच्या जागा भाजप शिंदे गटाला देईल याची खात्री नाही. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला नाशिक जिल्ह्यात मात्र 15 पैकी अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे यातून दिसून येत आहे. महाविकास आघाडीत मात्र त्याच्या विपरीत स्थिती असून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आक्रमक पद्धतीने निवडणुकीची तयारी आणि जागा वाटपाचे सूत्र सांगण्यास सुरुवात केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या काही मतदारसंघांमध्ये देखील दावा केला आहे. या शिवाय मतदार संघांमध्ये शिवसेना ठाकरे गट मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होता. ते मतदार संघ शिवसेना आपल्याकडेच ठेवणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट अधिक आक्रमक पद्धतीने जागावाटपाच्या चर्चेत सहभागी असल्याच्या चर्चा आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here