Dada Bhuse | अन् एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने प्रस्थापितांना घरी बसवले…

0
72
#image_title

Dada Bhuse | राज्याच्या राजकारणातील दिग्गज घराण्यांपैकी एक असलेल्या हिरे घराण्याला उतरती कळा कशी लागली..? आपला मतदार संघ सोडून हिरेंना नाशिककडे का निघावे लागले..? एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने प्रस्थापितांना कसे घरी बसवले. बघूयात मालेगावच्या राजकारणावर झोत टाकणारा एक ग्राउंड रिपोर्ट…

मालेगावच्या दाभाडी मतदार संघातून भाऊसाहेब हिरे यांच्यापासून सुरुवात झाली ती हिरे कुटुंबाच्या राजकीय कारकि‍र्दींची.. मालेगावमधील स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्याच्या महसूल मंत्रीपदापर्यंत भाऊसाहेब हिरे यांनी अनेक पदं भूषविली. त्यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसा हा त्यांचे पुत्र व्यंकटराव हिरे यांनी पुढे नेला. आताचा मालेगाव बाह्य आणि आधीचा दाभाडी मतदार संघ हा कधीकाळी हिरे घराण्याचा बालेकिल्ला होता. व्यंकटराव हिरे हे 1967 ते 1972 याकाळात राज्य मंत्रीमंडळात मंत्री होते. यानंतर त्यांनी त्यांचे चुलत भाऊ बळीराम हिरे यांना राजकारणात आणले आणि पाहता पाहता त्यांची थेट मंत्रीपदी वर्णी लागली. पण याच निर्णयामुळे मालेगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला भाऊच भावाच्या विरोधात उभा ठाकला आणि हिरे घरण्यात फुट पडली.

दादा भुसे | जागावाटप, मराठा आरक्षण, लाडकी बहीण मजबूती दादा भूसेंचे स्पष्टीकरण

बळीराम हिरे यांनी राजकारणात पाय रोवल्याचे लक्षात येताच व्यंकटराव हिरे यांनी आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 1980 च्या निवडणुकीत बळीराम हिरे हे कॉंग्रेस i कडून तर व्यंकटराव हिरे हे कॉंग्रेस u कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. भावा विरुद्धच्या या निवडणुकीत व्यंकटराव हिरे यांचा पराभव झाला. भावांमधील या लढतीनंतर पुढे 1985 च्या निवडणुकीत दोन्ही जावांमध्ये लढत रंगली. व्यंकटराव हिरे यांनी पत्नी पुष्पाताई हिरे यांना शरद पवारांकडून s कॉंग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. तर, दुसरीकडे बळीराम हिरे यांनीही त्यांच्या पत्नी इंदिराताई हिरे यांना कॉंग्रेसकडून तिकीट मिळवून दिले. दोन जावांमधील या लढतीत पुष्पाताई विजयी झाल्या आणि त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली.1990 मध्येही पुष्पाताईंनीच दाभाडीचा गड राखला. 1995 च्या निवडणुकीत दीर विरुद्ध भावजय यांच्यात लढत रंगली आणि यात बळीराम हिरे यांना अवघ्या 2500 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.तर पुष्पाताईंनी हॅट्रिक करत मंत्रीमंडळात पुन्हा स्थान मिळवले. 1999 च्या निवडणुकीत पुष्पाताईंचे चिरंजीव प्रशांत हिरे यांना आमदारकीची स्वप्न पडू लागले.

यामुळे भाऊ विरुद्ध भाऊ, जाव विरुद्ध जाव, दीर विरुद्ध भावजय या लढतीनंतर दाभाडीत आई विरुद्ध मुलगा अशी लढत रंगण्याची शक्यता बळावत असतानाच पुष्पाताईंनी माघार घेतली आणि प्रशांत हिरे हे 1999 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. प्रशांत हिरेंविरोधात त्यांचे काका बळीराम हिरे हे कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीत उतरले. काका विरुद्ध पुतण्याच्या या लढतीत पुतण्याने काकाचा पराभव करत बाजी मारली आणि प्रशांत हिरेंची मंत्रीमंडळात वर्णी लागली.

मात्र, इथूनच हिरे घराणे हे दाभाडीच्या जनतेपासून दुरावले. संस्थेच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीचे सुर उमटले. विजयाचा धुरळा हा डोक्यात गेलेल्या हिरे घरण्याला जमिनीवर आणण्याचा निर्धारच मालेगावच्या जनतेने केला आणि गुर्मीत असलेल्या हिरे घराण्याला 2004 च्या निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागली. 2004 ची निवडणूक ही निर्णायक ठरली आणि येथूनच हिरे घराण्याच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. या निवडणुकीत प्रशांत हिरे हे राष्ट्रवादीकडून तर त्यांचे बंधु प्रसाद बळीराम हिरे हे भाजपकडून निवडणुकीत उतरले आणि येथेच मालेगावच्या राजकारणात एंट्री झाली ती दादाजी भुसे यांची. धर्मवीर आनंद दिघेंचे कट्टर समर्थक असलेले दादा भुसे हे भाजप शिवसेना युती असल्याने दाभाडी मतदार संघातून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी कप बशी या चिन्हावर निवडणूक लढवली.

Dadaji Bhuse | आठ दिवसात रिझल्ट द्या अन्यथा कारवाई; मंत्री भुसेंनी यंत्रणेला खडसावले

आधीच वारं फिरलेलं होतं.हिरे घराणं हे डोईजड होत असल्याने भाजप शिवसेना युतीतील आणि राष्ट्रवादीच्याही बड्या नेत्यांनी पडद्यामागून भूसेंना पाठिंबा दिला आणि प्रस्थापित हिरे घराण्याचा पराभव करत दादा भुसे यांनी गुलाल उधळला. कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या सामान्य शेतकरी कुटुंबातील एका शेतऱ्याच्या मुलाने मालेगावातील दिग्गज राजकिय घरण्याच्या कारकीर्दीला फुल्ल स्टॉप लावत. मालेगावच्या राजकारणात इतिहास घडवला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here