Dada Bhuse | जागावाटप, मराठा आरक्षण, लाडकी बहीण योजनेबाबत दादा भूसेंचे स्पष्टीकरण

0
93
Nashik News
Nashik News

जळगाव :  राज्यात सध्या सर्वच पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वेध लागले असून, आघाडी आणि युतीतील पक्षांकडून जागांवर दावे केले जात आहेत. दरम्यान, नुकतंच अजित पवारांनी आपण महायुतीती जागा वाटपाचा (Mahayuti Seat Sharing) निर्णय जवळपास निश्चित झाला असून, आम्ही युतीत सन्मानजनक जागा लढवणार असल्याचा दावा केला होता.

यावर आता शिंदे गटाचे मंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी अजित पवारांचे समर्थन केले आहे. “याच्यात काय गैर आहे. विधानसभेच्या महायुतीतील जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय सगळ्यांनाच मान्य असेल. त्यांच्या निर्णयानुसारच आम्ही पुढे मार्गक्रमण करू, असे दादा भुसे म्हणाले.

Dadaji Bhuse | आठ दिवसात रिझल्ट द्या अन्यथा कारवाई; मंत्री भुसेंनी यंत्रणेला खडसावले

Dada Bhuse | मराठा समाजाच्या तरुणांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत आहे

“मराठा समाजाला राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतली असून, अनेकांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मात्र या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. तसेच या निर्णयानुसार मराठा समाजाच्या तरुणांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभदेखील मिळत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाखोंच्या संख्येने यंत्रणा कामाला लावून मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल तयार केला असून, इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे आणि त्यावर ते ठाम आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात सह्याद्रीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते हजर राहिले नसल्याचेही मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यावेळी म्हणाले.

Dada Bhuse | विद्यार्थ्यांना करियर निवडताना स्वातंत्र्य द्या; मंत्री दादा भुसेंचे पालकांना आवाहन

माझ्या लाडक्या बहिणींना माहित आहे की काय शक्य आणि काय अशक्य

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. यावरून दादा भुसे यांनी विरोधकांनी प्रत्युत्तर दिले आहे. “हेच लोक आधी बोलायचे की महायुती सरकार हे असंविधानिक आणि घटनाबाह्य सरकार आहे. आता आम्ही लाडकी बहीण योजना आणल्यानंतर हे पंधराशे रुपये कुठून देणार? असा प्रश्न उपस्थित करतात आणि नंतर हेच महाभाग दहा हजार रुपये दिले पाहिजे, अशी मागणी करतात.

विरोधकांकडून लोकांमध्ये अफवा व संभ्रम निर्माण करण्याचा पर्यटन केला जात असून, यात लोकसभेला ते यशस्वी झाले. मात्र आता विधानसभेला ते यशस्वी होणार नाही आणि राज्यातील जनताही त्यांना थारा देणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना देखील हे माहित आहे की काय शक्य आणि काय अशक्य आहे. या योजनेसाठी पैशांची तरतूद झालेली आहे आणि रक्षाबंधन व भाऊबीजेची भेट मुख्यमंत्री बहिणींना देतील, असे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here