High Court | अक्षय शिंदेच्या एनकाउंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला फटकारले

0
112

High Court | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर वरून आता त्याचे वडील अण्णा शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयात गेले असून शिंदेनी तातडीने फौजदारी रीट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. ज्यामध्ये उच्च न्यायालयाने पहिल्या नजरेतच काहीतरी गडबड दिसते.” असे म्हणत संशय व्यक्त केला आहे.

Akshay Shinde | अक्षयच्या कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार; अक्षयला फसवण्यात आल्याचा केला आरोप

वकील अमित कटारनवरे हे अण्णा शिंदे यांचे न्यायालयीन काम पाहत असून यावेळी न्यायालयात शिंदे यांच्याकडून “विधानसभा निवडणूक असल्याने राजकीय फायदा घेतला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. माझ्या मुलाचा मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी निर्गुण खून करण्यात आला.” असल्याचा आरोप त्यांनी वकिलामार्फत केला आहे.

एसआयटी स्थापन करण्याची मागणी

तसेच, “या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली सखोल चौकशी व्हावी व या तपासासाठी एसआयटी स्थापना करावी. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. “या संपूर्ण प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचा न्याय, देवाभाऊचा न्याय अशी शीर्षके असलेले मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. असे असेल तर न्यायव्यवस्थेची गरज काय?” असा सवाल याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

न्यायालयाकडून अनेक प्रश्न उपस्थित

न्यायमूर्ती चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली असून यावेळी न्यायालयाने या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ” आरोपी सोबत चार पोलीस तैनात असताना देखील ते एका व्यक्तीला ताब्यात ठेवण्यात अपयश ठरले हे अविश्वसनीय आहे. ते देखील गाडीच्या मागील भागात आरोपीच्या बाजूला आणि पुढे दोन पोलीस होते. त्याचप्रमाणे पिस्तुलावर देखील हाताचे ठसे असायला हवेत आणि हात धुतलेला असायला हवा. पुढच्या तारखेला सर्वकाही सादर करा.” असे न्यायालयाकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे.

Badalapur Case | बदलापूर लैगिंक आत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर; नेमक काय घडलं…?

त्याचबरोबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार “शिंदेंनी तीन गोळ्या झाडल्या होत्या, पण एकच गोळी आरोपीला लागली. मग उरलेल्या तीन गोळ्या गेल्या कुठे? त्याने गोळीबार थेट पोलिसांवर केला होता का? पोलिसाला कोणती दुखापत झाली आहे? छेद देऊन जाणारी…की स्पर्श करून जाणारी?” असा सवालही न्यायमूर्तींनी पोलिसांना यावेळी विचारला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here