Crime News | निवडणुकीच्या धामधुमीत सांगलीत भाजपच्या नेत्याची कुऱ्हाडीने निर्घुण हत्या

0
103
#image_title

Crime News | विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची आज सकाळी कुऱ्हाडीने वार करत हत्या करण्यात आली आहे. खाडे जमीन विकासाकाचे काम करत असून वादग्रस्त जमिनीत कुंपण घालण्यासाठी गेले असता हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तर ऐन निवडणुकीपूर्वी हा प्रकार घडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nashik Crime | नाशकात नाकाबंदीदरम्यान 33 लाख रुपयांची रक्कम जप्त

नेमके काय घडले? 

पोलिसांच्या माहितीनुसार, खाडे यांनी पंढरपूर रस्त्यावरील कारणे चार एकर न्याय प्रविष्टीत असणारी जमीन विकसनासाठी घेतली होती. ते आपल्या काही साथीदारांसह संबंधित शेत जमिनीत गेले होते. याचवेळी शेत जमिनीचे कब्जे धारक व सुधाकर खाडे यांच्यामध्ये जोरदार वादावाद झाली व संशयित आरोपीने सुधाकर खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

हा वार मानेवर वर्मी बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दरम्यान, सुधाकर खाडेंच्या खुणाच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे. तसेच खुनाची घटना मोबाईलमध्ये चित्रित देखील झाली असून खाडे यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, उपाध्यक्ष प्रणील गिलडा, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले.

Crime News | जळगावात प्रचारादरम्यान उमेदवारावर गोळीबार; नेमकं काय घडलं..?

खाडेंची कारकीर्द वादग्रस्त

जवळजवळ वीस वर्षांपूर्वी खाडे यांनी मिरजेच्या राजकारणात प्रवेश केला होता. सुरुवातीला ते शिवसेनेत होते. त्या काळात त्यांनी मिरजेतील अवैध धंद्यांविरोधात, दारूविरोधात आंदोलन केले. त्यानंतर ते एका बलात्कार प्रकरणात अडकले, मिरज अर्बन बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात ही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होते. तर काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here