PM Narendra Modi | ‘कोऱ्या पानांचे संविधान घेऊन फिरणारे लोक पापी’; पंतप्रधान मोदींनी साधला राहूल गांधींवर निशाणा

0
36
PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi | विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोल्यात प्रचारसभा आज अकोल्या पार पडली. यावेळी त्यांनी, “काँग्रेसने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत अपमान केला आहे. नेहरूंपासून आतापर्यंतच्या काँग्रेस नेतृत्वाने बाबासाहेबांचे योगदान नाकारले आहे. काँग्रेसचे लोक बाबासाहेबांचा अपमान करतात. ते दलित मातेचे पुत्र होते म्हणून त्यांची संविधान निर्माता ही ओळख काँग्रेसला खूपते, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझ्यासाठी पूजनीय आहेत व राहतील. आम्ही देशभरात त्यांची स्मारक उभारली आहे. काँग्रेसच्या शाही परिवाराने बाबासाहेबांच्या पंचतिर्थाला वंदन केले, हे सिद्ध करावे.” असं म्हणत काँग्रेसला थेट आव्हान देत काँग्रेसवर निशाणा साधला.

Pm Narendra Modi | ‘बहिणींनो यांच्यापासून सावध राहा’; नाशकात पंतप्रधानांची तोफ धडाडली

“कोऱ्या पानांचे संविधान पुस्तक घेऊन फिरणारे लोक पापी”

“आदिवासी, दलित व ओबीसींची काँग्रेस प्रगती पाहू शकत नाही. काँग्रेसला दलितांमध्ये, जाती-जातीत भांडणं लावायची आहेत. हे काँग्रेसचे चाल-चरित्र आहे. देशात काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल.” असे देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले. “हरियाणात काँग्रेसचे मनसुबे उधळून लावले आहेत. काश्मीर विधानसभेत काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर केला. दहशतवादी संघटना पाकिस्तानने हे कलम हटविण्याचा विरोध केला होता. काँग्रेस देखील तीच भाषा बोलते. 370 लागू केलं तर काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पुन्हा संपुष्टात येईल. कोऱ्या पानांचे संविधान पुस्तक घेऊन फिरणारे लोक पापी आहेत.” असे म्हणत राहुल गांधींना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

PM Narendra Modi | ‘छत्रपतींच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो’; नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची मागितली माफी.

ही गर्दी विजयाचा विश्वास देणारी

तसेच, “20 नोव्हेंबरला महाराष्ट्राला नवी दिशा द्यायची आहे. महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा. कालच्या दोन आणि आजच्या सभेतील गर्दी पाहता ही गर्दी विजयाचा विश्वास देत आहे.” असे हे मोदी यावेळी म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here