Crime News | रिचार्जसाठी पैसे न दिल्याने; नातवाने आजीचा घोटला गळा

0
7

Crime News |  आजमितीला मोबाईल ही ह्या काळाची गरज असून, मोबाईलमुळे जग जवळ आले. पण, असे असले तरी मोबाईलचा अति वापर व त्याच्या आहारी जाणारे व्यसन हे फार भयानक असू शकते. मोबाईलच्या अतिजास्त वापरातून होणाऱ्या अपघातांची अनेक उदाहरणे आपण बघत किंवा वाचत असतो.

अशाच एका मोबाईलच्या व्यसनी गेलेल्या तरुणाने केवळ मोबईल रीचार्जसाठी पैसे न दिल्याच्या रागातून चक्क आपल्या आजीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना यवतमाळच्या बाभूळगाव ह्या तालुक्यातील रेणूकापूर येथे घडली आहे.

७६ वर्षीय सिंधुबाई भरत पोवते असे ह्या मयत आजीचे नाव आहे. तर २५ वर्षीय महेश विश्वास पोवते असे या प्रकरणातील आरोपी नातवाचे नाव आहे. या प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केलेली असून, घटनेचा पुढील तपासदेखील पोलिसांनी सुरू केला आहे.

Breaking | मोदी सिंधुदुर्गात दाखल; मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

आजीचा घोटला गळा

मोबाईल रीचार्ज करण्यासाठी पैसे दिले नाही. या किरकोळ कारणावरून रागात असलेल्या नातवाने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी २५ वर्षीय आरोपी असलेला नातू महेश विश्वास पोवते याने आपल्या मोबाईल रिचार्जसाठी पैसे देण्यासाठी आपल्या आजीकडे तगादा  लावला होता. पण, आजीने त्यासाठी नकार दिल्याने, आजी व नातवामध्ये फार वाद झाला व या वादातून रागाच्या भरात नातवाने चक्क आपल्या आजीचाच गळा आवळून तिची हत्या केली.

नातवाला ठोकल्या बेड्या 

ही धक्कादायक घटना यवतमाळच्या बाभूळगाव ह्या तालुक्यातील रेणूकापूर या गावात घडली. दरम्यान, ही घटना मयत सिंधुबाई यांच्या मुलीच्या लक्ष्यात आल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून आरोपी महेश पावते याच्या विरोधात तक्रार दिली तसेच घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, या तक्रारीवरून यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी  तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपी महेश विश्वास पोवते याला अटक केली.

या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण, शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी हा खुनाचा गुन्हा दाखल करत संबंधित आरोपीला अटक केली. या प्रकरणातील पुढील तपास हा बाभूळगाव पोलिस ठाण्यात सुरू आहे.

Nashik News | चांदवड नगरपरिषद घनकचरा प्रकल्प विरोधात साखळी उपोषण

नेमके प्रकरण काय..?

या प्रकरणातील आरोपी २५ वर्षीय नातू महेश विश्वास पोवते याचा काही दिवसांपासून मोबाईलचा रीचार्ज हा संपलेला होता. रीचार्जसाठी त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याने आपल्या आजीकडे रीचार्जसाठी पैश्यांची मागणी केली. पण, आजीने त्याला नकार दिला व त्याने पैश्यांसाठी परत आजीकडे तगादा लावला होता. त्यानंतर आजीचा व महेशचा वाद झाला व या वादातून रागाच्या भरात महेशने टोकाचे पाऊल उचलत आजीची गळा आवळला. दरम्यान, काही वेळेतच ह्या आजीचा जागीच मृत्यू झाला.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here