Marathi Song | ए. टी. पवारांवरील गीत प्रदर्शित! या गौरव गीताला जिल्हाभरातून जोरदार प्रतिसाद

0
5

कळवण | माजी मंत्री स्वर्गीय ए. टी. पवार यांच्या जयंती निमित्त दळवट येथे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते ए. टी. पवार यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड लिखित “गाजला ए टी पवार, पाणदेव म्हणून गाजला..” हे गौरवगित प्रदर्शित करण्यात आलं असून त्याला आज दिवसभरात कसमादेसह संपूर्ण जिल्ह्यातून जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे. (Marathi Song)

Crime News | रिचार्जसाठी पैसे न दिल्याने; नातवाने आजीचा घोटला गळा

कळवण मतदारसंघाचे आठ पंचवार्षिक प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच चार वेळा मंत्री म्हणून राहिलेल्या ए. टी. पवार यांनी कळवण मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणाची गंगोत्री मतदारसंघात आणली होती. मतदारसंघात शेकडो छोटे, मोठे लघुपाटबंधारे, पाझर तलाव आणि अर्जुन सागरच्या धरणाची निर्मिती करून मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् केला. त्यामुळे ए. टी. पवार यांना कळवणसह जिल्हाभरात त्यांना पाणदेव म्हणून संबोधले जाते.

त्यांच्या विकास गाथेवर आधारित त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हे गौरवगित साकारले. आमदार नितीन पवार, शकुंतला पवार, माजी जि. प. अध्यक्षा जयश्री पवार, प्रा. गणेश शिंदे, जि. प. सदस्या गीतांजली पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, तहसीलदार रोहिदास वारुळे आदी मान्यवर अनावरणप्रसंगी उपस्थित होते.

Breaking | मोदी सिंधुदुर्गात दाखल; मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

हे गीत साकारण्यासाठी गीतकार आणि निर्माते डी. एम. गायकवाड, सहाय्यक निर्माता राजू पाटील, संजय सोनवणे, विशाल वाघ, छबूनाना कवर, सोमनाथ सोनवणे, रामदास पवार यांनी परिश्रम घेतलेले आहेत. या गीताला आवाज नाशिकचे प्रसिद्ध गायक तसेच संगीतकार संजय गिते, सोर्स म्युझिक स्टुडिओ यांनी दिला आहे. योगेश विसपुते, योगेश ढुमसे यांनी कँमेरामन म्हणून काम पाहिले आणि गीत प्रदर्शित करण्यासाठी भूषण पगार यांनी सहकार्य केले. हे गीत प्रदर्शित होऊन युट्यूब तसेच सोशल मिडियावर अपलोड होताच त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. (Marathi Song)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here