Skip to content

Breaking | मोदी सिंधुदुर्गात दाखल; मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण


Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत. नुकतेच ते सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. यानंतर सिंधुदुर्गात नौदल दिन २०२३ च्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तारकर्ली बीचवर नौदलाच्या प्रदर्शनातही ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. (Breaking News)

Nashik News | चांदवड नगरपरिषद घनकचरा प्रकल्प विरोधात साखळी उपोषण

दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल प्रदर्शनाचे आयोजन केले जाते आणि यामध्ये नौदलाची जहाजे, पाणबुड्या आणि लढाऊ विमान भारताची ताकद दाखवत असतात. सामान्य जनतेलाही कार्यक्रमात सहभागी होता येते, ज्यामुळे त्यांना नौदलाची माहिती मिळते.

यंदा सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारसाला आदरांजली वाहिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी पहिले स्वदेशी विमान आयएनएस विक्रांत नौदलात सामील करून घेतलेले होते. दरम्यान, ६ मार्च २०२२ रोजी पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधान मोदींनी केलेले होते. ही ९.५ फूट उंचीची मूर्ती असून तिचे वजन १ हजार ८५० किलो आहे आणि ही मूर्ती गनमेटलपासून बनवण्यात आलेली आहे.

Supriya Sule | शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुळेंची लोकसभेत मागणी

मोदींचा सिंधुदुर्ग दौरा, नौदलाच्या कार्यक्रामासाठी हजारो नागरिक दाखल

भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले आहेत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. मालवणमध्ये युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यासह विधानसभा अध्यक्ष, स्थानिक खासदार, आमदार उपस्थित असणार आहेत. दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे संस्थापक, म्हणून राजकोट किल्ल्यावर महाजारांच्या  पुतळ्याचं आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!