Crime News | जनसामान्यांवर काही अत्याचार झाल्यास लोक पोलिसांकडे दाद मागतात. ‘खाकी’ म्हणजे सूरक्षेचे प्रतिक. मात्र, याच खाकी धारकच सामन्यांच्या जीवावर उठले तर, न्यायाची आणि सुरक्षेची अपेक्षा कोणाकडून करावी. हि धक्कादायक घटना धारशिव जिल्ह्यात घडली असून, एका पोलीस कर्मचाऱ्यांने ऊसतोड कामगार महिलेवर जबरदस्ती करत बलात्कार केला असून, यामुळे आता संपूर्ण धारशिव जिल्हा हादरला आहे.
आरोपी पोलिस कर्मचाऱ्यावर भूम पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, हा प्रकार आष्टावाडी शिवारात २ फेब्रुवारीला सायंकाळच्या दरम्यान घडला आहे. तर, या प्रकरणी पोलीस कर्मचारी दगडू सुदान भुरके आणि खासगी जीप चालक सागर चंद्रकांत माने या दोघं आरोपींच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Crime News)
Nashik Crime | नाशिकच्या एक रिसॉर्टमध्ये दाजीनेच मेहुणीला…
Crime News | नेमकं प्रकरण काय.?
अधिक माहितीनुसार, संबंधित ऊसतोड महिला कामगार आणि तिचा दीर हा भूम बसस्थानकात दुपारच्या सुमारास बार्शीकडे जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबले होते. याचवेळी भूम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला आरोपी दगडू सुदान भुरके हा त्या ठिकाणी आला. तो पिडीत महिलेकडे आल व ‘कोठून आलाय? इथे कशासाठी थांबलाय? तुम्ही चोर दिसताय? असे उलटसुलट प्रश्न करू लागला.
यानंतर त्याने सहकारी आरोपी खासगी चालक सागर माने याला फोन करून जीप घेऊन बोलावले आणि पीडित महिला आणि तिच्या दिराला पोलीस ठाण्यात येण्यास सांगत जीपमध्ये बसवले व बसस्थानकाच्या बाहेरील बाजारात नेले. बाहेर नेल्यावर दोघांना सोडण्यासाठी १० हजारांची मागणी केली. दरम्यान, यावेळी पीडितेने ऊसतोड मुकादमांना फोन करून सांगितले आणि आरोपीच्या मोबाईलवर पैसे पाठवले. पैसे मिळाल्यानंतर त्या दोघांना तिथेच सोडून हवालदार तिथून निघाला.(Crime News)
Kalyan | भाजप आमदाराने पोलिस ठाण्यातच शिंदेंच्या नगरसेवकावर झाडल्या गोळ्या
ज्वारीच्या शेतात नेत केला बलात्कार
आरोपी हवालदार भुरके याने सोडल्यानंतर पीडिता व तिचा दीर पुन्हा ब स्थानकात आले. त्यानंतर हवालदार पुन्हा दुचाकीवरून तिथे आला व “तुम्ही इथे थांबू नका. तुम्हाला परत दुसरे पोलिस घेऊन जातील. मी तुम्हाला आष्टावाडीला सोडतो”, असे संगत त्यांना दुचाकीवरून आष्टावाडीला सोडले. त्याने तिथे गाडी थांबवली आणि एक फोन केला. तो फोन ठेवल्यानंतर त्याने महिलेला “मॅडमला तुम्हाला भेटायचे आहे. माझ्यासोबत पोलिस स्टेशनला चला” असे सांगितले.
नंतर दिराला तेथेच सोडून महिलेला दुचाकीवर बसवले काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी थांबवली आणि महिलेला बळजबरीने तेथील ज्वारीच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर संबंधित महिलेला पुन्हा आष्टावाडी येथे सोडून तो पसार झाला. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सर्व प्रकार संगितला. यानंतर दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम