Kalyan | भाजप आमदाराने पोलिस ठाण्यातच शिंदेंच्या नगरसेवकावर झाडल्या गोळ्या

0
74
Kalyan
Kalyan

Kalyan |  राज्याचे राजकीय वातावरण सध्या पेटलेले आहे. अशातच आता कल्याणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण मतदार संघात आधीच खासदार श्रीकांत शिंदेंच्याविरोधात भाजप आमदार नाराज असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, आता याच मतदार संघात सुरू असलेल्या राजकीय वादांचे विद्रूप रूप समोर आले असून, येथील एका भाजप आमदाराने थेट पोलिस ठण्यातच गोळीबार केला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्या आहेत. मात्र, या गोळ्या आपण आत्मसंरक्षणासाठी झाडल्याचं स्पष्टीकरण आ. गणपत गायकवाड यांनी दिलं आहे. दरम्यान, या गोळीबारात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड व राहुल पाटील हे जखमी झाले आहे.(Kalyan)

कल्याण डोंबिवली मतदार संघात हा भयानक राजकीय फिल्मी स्टाइल राडा बघायला मिळाला आहे. आजपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये वाद होत होते. मात्र, आता सत्ताधारिच आपापसांत भिडत असल्याचे आता दिसत आहे. काल शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री भुजबळांवर टिका केली. दरम्यान, हा वाद संपतोच की ही दुसरी घटना समोर आली आहे. कल्याणच्या उल्हासनगरच्या हिललाईन या पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. तर, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती आहे.

तसेच या घटनेत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड या घटनेत जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना आधी प्राथमिक उपचारांसाठी उल्हासनगर येथील मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यानंतर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या गोळीबारात फक्त महेश गायकवाडच नाहीतर त्यांचे मित्र राहुल पाटील यांनाही दोन गोळ्या लागल्या आहेत.

Deola | गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या देवळा पोलिसांकडून उद्धवस्थ

पाच ते सहा राउंड फायर

आमदार गणपत गायकवाड आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून राजकीय शीतयुद्ध सुरू होतं. याच शीतयुद्धाचे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात युद्धात रूपांतर झाले. अधिक महितीनुसार, हिललाईन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्येच हा गोळीबार झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर येथील द्वारली गावाच्या जागेच्या वादावरून शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार यांच्यात वाद झाले होते. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत काल पुन्हा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाडली. त्यामुळे काल हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता. या वादावरूनच  आ. गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड व सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर त्यांची बाजू मांडत होते. यावेळी वादातून  हा गोळीबार झाला आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयात पाच ते सहा राउंड फायर करण्यात आल्या होत्या.(Kalyan)

Kalyan | याधीही वाद…

जखमी माजी नगरसेवक महेश गायकवाड हे शिंदे गटाचे तरुण नेते आहेत. तसेच ते शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख आहेत. कोविड काळापासून महेश गायकवाड यांची शहरात लोकप्रियता वाढली आहे. त्यांच्या तडफदार समाजकार्यामुळे तरुणांमध्ये त्यांची क्रेझ आहे. मात्र, महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात सतत राजकीय वाद होत असतात. विशेष म्हणजे याधीही काही दिवसांपूर्वी महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक कोळसेवाडी पोलीस ठाण्यातच एका वादामुळे समोरासमोर आले होते.

BJP | भाजपचे नेते आता प्रत्येक खेडेगावात मुक्कामी राहणार

मला पश्चात्ताप नाही…

आमदार गणपत गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपणच गोळी झाडलेली असल्याचं कबूल केलं. “पोलीस ठाण्याच्या दरवाज्यातच त्यांनी माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेवर या लोकांनी जबरदस्तीने कब्जा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात गुन्हेगारीचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील तर आता महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्या सारख्या साध्या माणसालाही आज एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार बनवलं. मी स्वत: आत गोळी झाडली. आणि याचा मला काही पश्चात्ताप नाही. कारण माझ्या मुलांना जर हे पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारत असतील तर मग मी आणखी काय करणार?”, अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली आहे.(Kalyan)

“मी काही त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझं आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करावं लागलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळून ठेवले आहेत. आणि आता त्यांनी दुसऱ्याचं आयुष्यही खराब करायला घेतलं आहे”, असंही यावेळी आमदार गणपत गायकवाड म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here