Nashik Crime | नाशिकच्या एक रिसॉर्टमध्ये दाजीनेच मेहुणीला…

0
68
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime |  नाशिकमध्ये सध्या गुन्ह्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच नंदुरबारच्या एका मुलीची तिच्या प्रियकराने संशयाच्या कारणावरून हत्या केली होती. दरम्यान, यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकरण नाशिकमधून उघडकीस आले आहे. फिरायला नेण्याच्या बहाण्याने एक ३२ वर्षीय युवकाने संबंधित इंजिनिअर तरुणीवर बलात्कार केल्याचा हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.(Nashik Crime)

फिरण्याच्या बहाण्याने हा आरोपी तरुण पीडित तरुणीला घोटी येथील एका रिसोर्टवर घेऊन गेला आणि त्याने तिला जबरदस्ती करत दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने तिचे काही अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढले  आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पुन्हा दुसऱ्यांदा बलात्कार केला. दरम्यान, अखेर वैतागून या पीडित तरुणीने नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आता त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपी युवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नात्याने हा आरोपी पीडित तरुणीचा दाजी आहे.

Political News | गुन्हे धुण्यासाठी काँग्रेसचा आणखी एक नेता सत्ताधारी पक्षात..?

Nashik Crime | नेमकं प्रकरण काय..?

या प्रकरणी, आरोपी दळवी याचा स्टील रिटेलिंगचा व्यवसाय आहे. पीडित तरुणी ही त्याच्याच कार्यालयात नोकरी करते. आरोपी दळवी याने पीडितेसोबत ओळख वाढवत तिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने जुलै २०२२ मध्ये फिरण्याचा बहाणा करत पीडितेला नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील एका रिसोर्टवर नेत बळजबरीने दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला. (Nashik Crime)

Nashik Crime | खर्चायला पैसे देत नाही; पत्नीने रचला पतीच्या खुनाचा ‘मास्टर प्लॅन’

एवढ्यावरच न थांबता त्याने काढलेल्या अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने मुंबई नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. एवढेच नाहीतर त्याने तिच्यासह तिच्या नातेवाईकांनाही शिवीगाळ केली व धमकी दिली. आरोपीचा हा छळ असह्य झाल्याने पीडितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकारणाचा पुढील सविस्तर तपास मुंबई नाका पोलिस करत आहे.(Nashik Crime)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here