Crime News | महिला अत्याचाराचा सिलसिला थांबेना..; पुण्यामध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर

0
79
#image_title

Crime News : राज्यामध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. राज्य सरकार महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. परंतु तरीही राज्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र तसाच्या तसा आहे. बदलापूर मधील शाळेमध्ये जे काही घडले त्यानंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. परंतु आता पुण्यामधूनही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर येत आहे.

पुण्यातील घोरपडी परिसरात एका अल्पवयीन मुलाकडून 14 वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे ती गर्भवती राहिली आहे. पीडित मुलीच्या आईने या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या अल्पवयीन मुलावर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून मार्च 2024 ते मे 2024 दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे आता संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांनी राज्यभरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातही शाळेसारख्या ठिकाणी मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनांमुळे पालकही आपल्या मुलींना शाळेमध्ये पाठवण्यापासून घाबरू लागले आहेत.

Crime News | ‘धोखा देने वालों की एक ही सज़ा है ‘मौत’ म्हणत माथेफिरुने प्रेयसीला संपवलं; ७८ दिवसांत लागला निकाल

Crime News | पोलिसांचे पालकांना आवाहन

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेक आरोपी हे पिडीतेच्या ओळखीतील किंवा नातेसंबंधांपैकी निघाले आहेत. त्यामुळे आपली मुलगी सोशल मीडिया वापरत असेल तर ती कोणाच्या संपर्कात आहे? कोणासोबत बोलते? बाहेर जाते? भेटते? या सर्व गोष्टींवर पालकांनी लक्ष देणे फार गरजेचे आहे. कारण सोशल सोशल मीडिया या घटनांमध्ये मोठे माध्यम ठरू लागला आहे. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांसोबत मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. त्यांना चांगल्या वाईटाबद्दल माहिती दिली पाहिजे. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Nashik crime | नाशिकमध्ये भर रस्त्यात गायीवर अत्याचार; 26 वर्षीय तरुणाला अटक

पोलिसांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले गेले

त्याचबरोबर बदलापूरच्या घटनेनंतर धडा घेत पोलिसांकडून अनेक शाळांमध्ये गुड आणि बॅट टच असे उपक्रम राबवले गेले त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी किंमत करत आपल्या वर्ग शिक्षकांना त्यांच्यावरती अत्याचार झाल्याची माहिती दिली. यातून पालकांनी ही घरीच मुलांना काही गोष्टी विश्वासात घेऊन समजावून सांगणे फार महत्त्वाचे आहे. हे दिसून येते यामुळे आपण अत्याचाराला बळी पडण्यापासून वाचू शकतो.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here