Deola | देवळ्यात रघुनाथ हरी अमृतकार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

0
28
#image_title

Deola : देवळा येथे रघुनाथ हरी अमृतकार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 31 ऑगस्टला भारत कोठावदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यादरम्यान इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या सभासद पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच सभासदांना यावर्षी 8 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असून संस्थेने खरेदी केलेल्या जागेवर इमारत बांधण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. रघुनाथ हरी पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये संस्थेतर्फे खरेदी केलेल्या जागेवर इमारत बांधण्याच्या निर्णयामध्ये ज्येष्ठ सभासद सुखदेव जगदाळे, सतीश राणे, प्रमोद शेवाळकर, नंदू जाधव यांनी सहभाग घेतला होता.

Deola | वाखारी ग्रामपंचायतीच्या सदस्यांकडून सरपंच, उपसरपंचांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

यादरम्यान विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना चेअरमन भारत कोठावदे यांनी समर्पक उत्तरे दिली. तसेच संस्थेच्या प्रगती विषयी उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व्हॉ. चेअरमन राजेंद्र अहिरराव, कार्यकारी संचालक रोहन वडनेरे, भूषण कोटवदे, संजय अहिरराव, सुनील आहेर, राजेंद्र धामणे, देविदास ब्राह्मणकर, नितीन लाडे, किशोर सोनावणे, जयश्री मुसळे, भारती जाधव इत्यादी सभासद व कर्मचारी उपस्थित होते. सभेमध्ये अहवाल वाचनाचे काम व्यवस्थापक दावल आहेर यांनी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here