Crime News | पत्नीने पाचवं लग्न केलं अन् चौथ्या पतीने पेट्रोल टाकून पेटवले

0
40
Crime News
Crime News

Crime News |   सध्या राज्यात वैवाहिक कलहांवरून टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना वाढत आहे. दरम्यान, असेच एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पत्नीचे अंधेच ४ विवाह झाले असून, आता ती पुन्हा पाचवा विवाह करायला निघाली होती. यामुळे ते तिच्या चौथ्या पतीच्या जिव्हारी लागले आणि त्याने टोकाचा निर्णय घेत. स्वतःचे आयुष्य संपवले आहे. (Crime News)

दरम्यान, आपल्या पत्नीच्या पाचव्या लग्नाच्या निर्णयामुळे उद्भवलेल्या या वादातून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातून समोर आली आहे. मागील आठवड्यात इंदूर येथे पत्नीसोबत झालेल्या वादानंतर त्याने स्वत:ला पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीच्या पाचव्या लग्नावरुन त्याचे आणि पत्नीचे वाद झाले आणि त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती संबंधित पोलिसांनी दिली आहे.

Crime News | ….अन् चार मुलांचा बाप, पाच मुलांची आई असलेल्या मेहुणीला घेऊन फरार

Crime News | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, मृत व्यक्तीचे सुनील लोहानी असे आहे आणि तो त्याच्या पत्नीचा चौथा पती होता. या महिलेशी त्याचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. मात्र, लग्नाच्या काही दिवसांतच त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे या महिलेने पतीचं घर सोडलं आणि ती तिच्या माहेरी राहत होती.दरम्यान, आता या आत्महत्येमागील कारण हे खरंच या महिलेचं पाचवं लग्नच होतं का? याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहेत. (Crime News)

मृत पतीच्या विरोधात तक्रार

त्याच्या पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रारदेखील दिलेली होती. या तक्रारीनुसार, पती हुंड्यासाठी आपला छळ करत असल्याचा गुन्हा या महिलेने पोलिसांत दाखल केलेला होता. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन खटल्याला कंटाळूनदेखील या व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत लोहानी यांनी आत्महत्येपूर्वी स्वतःचा एक व्हिडीओ शूट केला होता. तसेच तो एका सुसाईड नोटसह त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात त्याची पत्नी पाचव्यांदा लग्न करत असल्यामुळे तो नाराज असल्याचे त्याने म्हटले होते.

Latur Crime | जिगरी मित्रच निघाला आईचा प्रियकर; म्हणुन झोपेतच संपवले

मृत व्यक्तीच्या पत्नीचे पाचवे लग्न झाले असून, यामुळेच त्याने इंदूर येथील जुनी या परिसरात स्वतःवर पेट्रोल टाकून घेत. पेटवून घेतले आहे. त्याच्या जवळच्या घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाल्याचेही  पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाची पुढील चुकशी करत आहेत.(Crime News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here