Milind Deora | १० – १५ दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप..?

0
3
Milind Deora
Milind Deora

Milind Deora |  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय होईल.ते काहीच सांगता येत नाही. आगामी लोकसभेपर्यंत तर अनेक मोठमोठ्या राजकीय घडामोडी होण्याच्या शक्यता आहेत. नुकतंच काल दक्षिण मुंबईमधील काँग्रेसचे कडवे समर्थक आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे आता काँग्रेसच्या गोटात भयाण शांतता पसरली आहे. मिलिंद देवरा यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते आणि १० माजी नगरसेवकही काल शिंदे गटात सामील झाले आहेत.(Milind Deora)

दरम्यान, नुकतंच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी येत्या १० ते १५ दिवसांत राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता मिलिंद देवरा यांचा एकाएकी शिवसेनेतील प्रवेश हा या भूकंपाची सुरुवात आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा सुरु असताना टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, (Milind Deora)

Gulabrao Patil | आमच्यामुळेच भाजप सत्तेत, शिंदेंच्या बड्या नेत्याने मेळव्यातच मांडले गाऱ्हाणे

मिलिंद देवरा यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत येत्या काही दिवसांत अनेक काँग्रेस आमदार तसेच पदाधिकारी हे आता शिवसेनेची वाट धरणार असल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिल्यानंतर आता ६ ते ७ काँग्रेस आमदार हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याबाबत काही गुप्त बैठका देखील पार पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो.

Milind Deora | लोकसभेआधी मोठा भूकंप?

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकींच्या आधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे रस्सीखेच तसेच राजकीय घडामोडी घडत आहेत. सर्वच पक्ष हे लोकसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज होत आहेत. तसेच सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघंही गटांमध्ये जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरू आहे.(Milind Deora)

Lok Sabha 2024 | संजय राऊतांमुळे काँग्रेसचा बडा नेता शिंदे गटात

सत्ताधाऱ्यांची एनडीए आणि विरोधकांची इंडिया आघाडी या गटांमध्ये खलबतं सुरू आहेत. सध्या दोन्हींकडे जागावाटपाचे सूत्र ठरत आहेत. मात्र, आता यातच काँग्रेसमचे ६ ते ७ आमदार हे आता खरंच शिवसेना शिंदे गटात  प्रवेश केला तर सत्ताधाऱ्यांची ताकद ही दुप्पट होऊ शकते. मात्र, विरोधकांचे आणि विशेषतः काँग्रेसचं यामुळे मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेस ही गळती थांबवण्यासाठी काय करते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here