Lok Sabha 2024 | संजय राऊतांमुळे काँग्रेसचा बडा नेता शिंदे गटात

0
3
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024

Lok Sabha 2024 |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी राज्यभरात जोरदार तयारी सुरू केली आहे. काही पक्षांनी प्रचाराचे नारळही फोडले आहे. नेत्यांकडून आपापल्या पक्षाची बाजू सावरण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचे तेढ मात्र कायम आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खदखद सुरू असल्याचे दिसत असून, यामुळे काँग्रेस काहीसे नाराज आहेत. दरम्यान, अशातच काँग्रेसला आता मुंबईत गळती लागली असून, काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याची माहिती आहे. (Lok Sabha 2024)

दरम्यान, जागा वाटपाच्या तिढ्यात ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा करण्यात आल्यापासूनच तेथील काँग्रेस नेते नाराज होते. याच नाराजीच्या कारणामुळे मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Ram Mandir | जे भाजपला नाही जमले ते ठाकरेंनी करून दाखवले

अधिक माहितीनुसार, आता मुंबईमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईमधील १० माजी नगरसेवक आणि तब्बल २५  पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. माजी खासदार मिलींद देवरा यांचा आज दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिंदे गटात पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती आहे. (Lok Sabha 2024)

मिलिंद देवरा हे आज सकाळी ११ वाजता सिद्धीविनायकाचं दर्शन घेतील. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील. १० माजी नगरसेवक, २५ पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांच्यासह माजी खा. मिलिंद देवरा हे आज शिंदेंच्या सेनेत वर्षा निवासस्थानी आज जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, असे असले तरी मिलिंद देवरा यांना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी कुठलेही आश्वासन देण्यात आलेले नाही. या मतदारसंघाकरीता भाजप उमेदवारही इच्छुक असल्याने आगामी काळात मिलिंद देवरा आणि दक्षिण मुंबई मतदार संघावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

PM Modi in Nashik | मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, देवळ्यातील आंदोलक ताब्यात

मिलिंद देवरा नाराज? काँग्रेसची साथ सोडणार?

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक एकवटले असून, महाविकास आघाडीची आगामी निंवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा हा आणखी चिघळत आहे. यामुळे अनेक नेते नाराज असल्याचीही माहिती आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीही दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा केला. तेव्हापासूनच काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम देत मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. (Lok Sabha 2024)

Lok Sabha 2024 | ठाकरे सेनेमुळे कोंडी 

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हटले होते की, दक्षिण मुंबईवर हा मतदार संघ ठाकरे गटाचा आहे आणि तेथे उमेदवारही आमचाच असेल. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या मतदार संघावर दावा केला होता. दरम्यान, कॉँग्रेस नेते मिलिंद देवरांच्या नाराजीचे हेच कारण असल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी थेट ‘आर नाहीतर पार’ चा निर्णय घेतला आहे आणि यानुसार ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here