Crime News | मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत अनाथ आश्रमातील कर्मचाऱ्यांनी २१ मुलींवर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. दरम्यान, या मुलींनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर याप्रकरणी पोलिसांनी संबंधित चार कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime News)
या अनाथ आश्रमातील मुलींनी कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेले असून, येथे ४ ते १६ वयोगटातील मुलींनी या हृदय द्रावक घटनेबाबत सांगितले आहे. या मुलींनी सांगितलेला प्रकार ऐकून पोलिसही हादरले. या आश्रमात तब्बल २१ मुलींवर क्रूरपण वागणूक देऊन त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे. दारम्यान, या मुलींचे कपडे उतरवून, त्यांना उलटं लटकवून लोखंडी चिमट्याने भाजण्यात आलं. एवढंच नाहीतर, त्यांना लाल मिरचीची धुरीही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही संपूर्ण घटना ऐकून पोलीसही हादरले आहेत.(Crime News)
Mumbai Crime | पिल्लू दोन मिनिटं त्रास होईल,पण…; महिन्यानंतर प्रेयसीचा मृतदेह हाती
असा झाला खुलासा
अधिक माहितीनुसार, या अनाथ आश्रमातील ४ कर्मचाऱ्यांनी त्या मुलींचे कपडे काढून त्यांना उलटे लटकावत लोखंडी चिमट्याने भाजले आणि लाल मिरचीची धुरीही दिली. बाल कल्याण समितीच्या पथकाने इंदूर येथील ‘वात्सल्यपुरम जैन ट्रस्ट’च्या या अनाथ आश्रमात अचानक भेट देऊन तपासणी केली असता, त्यानंतर या प्रकाराचा खुलासा झाला.
या पीडित मुलींनी अधिकाऱ्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल सांगितले. दरम्यान, या २१ पीडित मुलींच्या तक्रारीच्या आधारे इंदूर पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या चार कर्मचार्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Crime News)
Pune Crime | विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय; आरोपी अभिनेत्री ताब्यात
Crime News | या प्रकरणी कारवाई सुरू
या २१ पीडित मुलींनी त्यांच्या सोबत होत असलेल्या आत्याचाराची आणि छेडछाडीची माहिती दिली असून, या आधारे आता पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या अनाथ आश्रम आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ४ कर्मचारी हे दोषी आढळून आले आहेत.
या अनाथ आश्रमात वास्तव्यास असणाऱ्या मुली ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणाच्या चौकशीच्या दरम्यान संबंधित २१ मुलींवर अत्याचार झालेले असल्याचे आढळून आले. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आला असून, आम्ही या प्रकरणाचा अधिक व्यापक तपास सुरू केला आहे. मात्र, CWC अहवालानंतरच ही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे इंदूर पोलिसांनी सांगितले आहे.(Crime News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम